Ias Pooja Khedkar Case: खेडकर दाम्पत्याचा खरंच घटस्फोट? केंद्राने राज्याकडे मागितली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 12:33 PM2024-07-23T12:33:43+5:302024-07-23T12:34:54+5:30

पूजा खेडकरांच्या आई-वडिलांनी नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी घटस्फोट झाल्याचे दाखवून कमी उत्पन्न दाखवण्याचा प्रयत्न केला

manorama khedkar and dilip khedkar couple really divorced The Central government has sought information from the maharashtra state government | Ias Pooja Khedkar Case: खेडकर दाम्पत्याचा खरंच घटस्फोट? केंद्राने राज्याकडे मागितली माहिती

Ias Pooja Khedkar Case: खेडकर दाम्पत्याचा खरंच घटस्फोट? केंद्राने राज्याकडे मागितली माहिती

पुणे : प्रशिक्षणार्थी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांनी घटस्फोट झाल्याचे दाखवून कमी उत्पन्न दाखवण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने राज्य सरकारकडे खेडकर दाम्पत्याचा खरंच घटस्फोट झाला आहे का? याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पूजा खेडकर यांनी लोकसेवा आयोगाकडे नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करून परीक्षा दिली होती. पुढे खेडकर यांची आयएएस म्हणून निवड झाली. सध्या त्यांचा प्रशिक्षणार्थी कालावधी महाराष्ट्रात सुरू होता. दरम्यान, पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांचे उत्पन्न काही कोटींमध्ये असल्याचे समोर आले आहे. नॉनक्रिमिलेअरला विशिष्ट उत्पन्नाची अट आहे. परंतु, खेडकर यांचे वडील वर्ग एकचे अधिकारी म्हणून कार्यरत होते. असे असताना त्याचे उत्पन्न कमी कसे? असा प्रश्न उपस्थित झाला होता. या प्रमाणपत्राच्या अनुषंगाने तिने आई - वडिलांचा घटस्फोट झाल्याचे आयोगाला सांगत नोकरी मिळवली होती. आता त्यांच्या याच नॉनक्रिमिलेअरबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांचा खरेच घटस्फोट झाला होता का? ते घटस्फोटानंतर एकत्र राहत होते का? का केवळ मुलीला म्हणजेच पूजा यांना अधिकारी पदावर बसवण्यासाठी घटस्फोट घेण्यात आला? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी याबाबतचा अहवाल मागवला आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र शासनाने राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाला पत्र व्यवहार केला आहे. मात्र, पूजा खेडकर प्रकरणाचा तपास पुणेपोलिस करत असल्याने हे पत्र पुणे पोलिसांना पाठवण्यात आले आहे. त्यानुसार पुणे पोलिस खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोटासंबंधीचा सविस्तर अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे त्यांचा घटस्फोट खरंच झाला होता का ? याचा शोध आता पुणे पोलिसांचे पथक घेत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Web Title: manorama khedkar and dilip khedkar couple really divorced The Central government has sought information from the maharashtra state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.