Sharad Pawar: जनशक्तीने हुकूमशाही सरकारला नमवले: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 08:13 PM2021-12-25T20:13:56+5:302021-12-25T20:14:58+5:30

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचा धंदा परवडत नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची अवस्था बदलायची असेल तर अर्थकारण सुधारायला हवे...

manpower subdues dictatorial government said sharad pawar | Sharad Pawar: जनशक्तीने हुकूमशाही सरकारला नमवले: शरद पवार

Sharad Pawar: जनशक्तीने हुकूमशाही सरकारला नमवले: शरद पवार

googlenewsNext

पुणे: संसदेमध्ये कोणतीही चर्चा न करता सरकारने तीन कृषी कायदे पास करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याची भूमिका घेतली. या हुकूमशाही सरकारला जनशक्तीने शांततेच्या मार्गाने आंदोलन करून अन्यायकारक कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (sharad pawar) यांनी केले. ते सहकार महर्षी साहेबराव सातकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण आणि हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या विस्तारित नूतन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. 

खासदार शरद पवार यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचा धंदा परवडत नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची अवस्था बदलायची असेल तर अर्थकारण सुधारायला हवे असे सांगितले. सहकार क्षेत्रात साहेबराव सातकर यांच्या योगदानाची चर्चा केली. सहकार चळवळ पुढे न्यायची असेल तर  स्वच्छ व चोख तसेच उत्तम प्रशासकीय कारभार करण्याची गरज व्यक्त केली. साहेबराव बुट्टे पाटील यांच्या राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ही संस्था चांगले काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

उद्याच्या काळात कंपन्यांमध्ये रोजगार मिळवायचा असेल तर पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यवसायिक, तांत्रिक शिक्षणाची आवश्यकता असल्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ज्या भागात सामाजिक अशांतता आहे; तिथला विकास होत नसल्याचे सांगून गुन्हेगारीवर वचक बसवणार असल्याचे पवार म्हणाले. विधिमंडळात नुकताच मंजूर केलेल्या शक्ती कायद्याचे महत्त्व सांगून महिलांच्या सक्षमीकरणावर त्यांनी भर दिला. साहेबराव सातारकर यांचे सहकारातील योगदान कथन केले. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक वाटचालीचे पवार त्यांनी कौतुक केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (dilip walse patil) होते. याप्रसंगी नामदार दत्तात्रय भरणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते, संस्थाध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील, हिरामण सातकर, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ व खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ या संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी बांधव आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: manpower subdues dictatorial government said sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.