सहवासातून माणसाची जडण-घडण: घोडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:59+5:302021-06-03T04:08:59+5:30
प्राचार्य गोवर्धन राठोड तसेच लिपिक सुरेश चव्हाण यांच्या सेवानिवृत्ती समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी रोहिणी गायकवाड, सुदाम पिंगळे, ...
प्राचार्य गोवर्धन राठोड तसेच लिपिक सुरेश चव्हाण यांच्या सेवानिवृत्ती समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी रोहिणी गायकवाड, सुदाम पिंगळे, तुकाराम ताम्हाणे, एकनाथ शिवेकर या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शिक्षक प्रतिनिधी सुदाम पिंगळे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बगाटे, शिक्षकेतर प्रतिनिधी कुमार चौधरी तसेच शाळा व महाविद्यालयाचे निवडक शिक्षक उपस्थित होते.
डॉ. घोडेकर म्हणाले की, चांगल्या माणसांच्या सहवासात राहिल्यानंतर सुसंस्कारित तसेच चांगली माणसं निर्माण होतात. आज ज्यांचा सेवानिवृत्ती समारंभ आहे त्या लोकांनी चांगली सुसंस्कारित माणसं घडवली. उपक्रमशील शिक्षक तयार केले जेणेकरून त्याचा फायदा समाजाला तसेच विद्यार्थ्यांना झाला. सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघांचाही सपत्नीक सत्कार प्रशाला तसेच शिक्षक सोसायटी च्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष क्षीरसागर यांनी, तर आभार कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषदेचे सचिव जितेंद्रकुमार थिटे यांनी मानले.