मान्सून केरळच्या सीमेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 04:04 PM2018-05-28T16:04:24+5:302018-05-28T16:04:24+5:30

केरळ ते कर्नाटक किनारपट्टीच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे संपूर्ण पश्चिम किनारपट्टीत पाऊस होण्याची शक्यता आहे़.

Mansoon on the border of Kerala | मान्सून केरळच्या सीमेवर

मान्सून केरळच्या सीमेवर

Next
ठळक मुद्देमंगळवारी आगमनाची शक्यता, मायाबाजार, अंदमान निकोबार बेट तसेच अरबी समुद्रातही आगेकूच

पुणे : मान्सूनने सोमवारी जोरदार वाटचाल करीत केरळच्या सीमेपर्यंत धडक मारली असून येत्या २४ तासात तो केरळ, तामिळनाडुतील अनेक भागांमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे़. भारतीय हवामान विभागाने २९ मे रोजी मान्सूनचे केरळला आगमन होणार असल्याचा अंदाज जाहीर केला होता़. हा अंदाज यंदा बरोबर ठरला असून मंगळवारी मान्सून केरळमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने अनुकुल परिस्थिती आहे़. मान्सूनने सोमवारी जोरदार वाटचाल करीत बंगालचा उपसागरात खोलवर मुसंडी मारली़. मायाबाजार, अंदमान निकोबार बेट तसेच अरबी समुद्रातही आगेकूच केली आहे़. 
केरळ ते कर्नाटक किनारपट्टीच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे संपूर्ण पश्चिम किनारपट्टीत पाऊस होण्याची शक्यता आहे़. काही दिवसांपूर्वीच स्कायमेट या संस्थेने मान्सून दि. २८ मे रोजी केरळात दाखल होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर हवामान विभागाने २९ मे रोजी मान्सून येणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले.  मागील काही वर्षांचे चित्र पाहिल्यास यंदा मॉन्सून लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. मॉन्सून दरवर्षी सर्वसाधारणपणे दि. १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, तर अंदमानमध्ये दाखल होण्याची तारीख २० मे आहे. परंतु, अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने अंदमानच्या दक्षिण समुद्रात मान्सूनचे आगमन यंदा उशिरा झाले होते़. चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर त्याने वेगाने वाटचाल केली़. भारतीय हवामान विभागाकडून मागील काही वर्षांत जाहीर केलेला मान्सूनचा अंदाज खरा ठरला आहे. केवळ २०१५ मध्ये हा अंदाज चुकला होता. यावेळी विभागाने दि. ३० मे रोजी मॉन्सून केरळमध्ये दाखल होईल, असे जाहीर केले होते. पण त्यावर्षी मान्सूनचे आगमन सहा दिवस उशिराने दि. ५ जून रोजी झाले होते. 
मागील वर्षी दि. ३० मे रोजी केरळात मान्सून दाखल झाला होता. तसेच हवामान विभागानेही ३० मे हा अंदाज व्यक्त केला होता. तर २०१३, २०१४ व २०१६ च्या अंदाजात केवळ १-२ दिवसांचा फरक होता. त्यामुळे यंदाही हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्यास मागील सहा वर्षांत पहिल्यांदाच मान्सून लवकर दाखल झाला असे म्हणता येईल़.

Web Title: Mansoon on the border of Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.