विवाहितेला नग्न होऊन अंघोळ करायला भाग पाडणाऱ्या मांत्रिकाला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 02:19 PM2022-08-23T14:19:01+5:302022-08-23T14:19:20+5:30

मांत्रिकाला कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर मधून पोलिसांनी ताब्यात घेतले

Mantrik who forced a married woman to bathe naked was shackled | विवाहितेला नग्न होऊन अंघोळ करायला भाग पाडणाऱ्या मांत्रिकाला ठोकल्या बेड्या

विवाहितेला नग्न होऊन अंघोळ करायला भाग पाडणाऱ्या मांत्रिकाला ठोकल्या बेड्या

googlenewsNext

पुणे : पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून सर्वांसमोर अंघोळ करायला लावली. महिलेला वेळोवेळी मारहाण करून तिच्याकडून १ ते २ कोटीची रक्कम उकळल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली होती. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्याचबरोबर ज्या मांत्रिकाने सर्वांसमोर अंघोळ करायला लावली त्याच्यावरही भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. अखेर त्या मांत्रिकाला कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर मधून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मौलाना बाबा जमादार असे या बाबाचे नाव आहे. 

व्यवसायामध्ये यश मिळावे तसेच कुटुंबात सुख शांती लाभावी. यासाठी एका उद्योजकाने पत्नीची अघोरी पूजा करून पुत्र प्राप्तीसाठी मंत्रिकाच्या सांगण्यावरून पत्नीला सर्वांसमक्ष अंघोळ करायला लावण्याचा किळसवाणा प्रकार घडला होता. या घटनेनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ने जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार लवकरात लवकर आरोपींना अटक व्हावी अशी मागणी केली होती. 

दरम्यान महिलेच्या पतीसह सासरच्यांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. यामध्ये फिर्यादीचा पती, सासरा आणि सासूने अत्याचार केले आहेत. या तिघांवरही गुन्हा दाखल झाला आहे. सासरच्यांकडून वेळोवेळी फिर्यादीचे शारीरिक आणि मानसिक शोषण करण्यात आले. फिर्यादीला तिच्या आई-वडिलांकडून लग्नात मिळालेले तिचे दागिने आणि फ्लॅटची कागदपत्रे परस्पर बँकेत ठेऊन त्यावर बनावट स्वाक्षरी करून ७५ लाखांचे कर्ज घेतले. तसेच फिर्यादीच्या पतीने व्यवसायात भरभराटी आणि घरात शांतता नांदावी म्हणून फिर्यादीसोबत अघोरी पुजा केली. त्यावेळी तिला सर्वांसमोर नग्न होऊन अंघोळ करायला लावली.

Web Title: Mantrik who forced a married woman to bathe naked was shackled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.