लोक अदालतमध्ये वाहतूक शाखेचे तब्बल १० हजार खटले निकाली; एकाच दिवसात सव्वा कोटी दंड जमा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 02:23 PM2021-08-02T14:23:54+5:302021-08-02T14:24:45+5:30

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये वाहतूक शाखा आणि मोटार वाहन न्यायालयाने १० हजार खटले निकाली काढण्यात आले.

As many as 10,000 cases of transport branch were settled in the people's court; A quarter of a crore fines were collected in a single day | लोक अदालतमध्ये वाहतूक शाखेचे तब्बल १० हजार खटले निकाली; एकाच दिवसात सव्वा कोटी दंड जमा 

लोक अदालतमध्ये वाहतूक शाखेचे तब्बल १० हजार खटले निकाली; एकाच दिवसात सव्वा कोटी दंड जमा 

Next

पुणे : शिवाजीनगर येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये वाहतूक शाखा आणि मोटार वाहन न्यायालयाने १० हजार खटले निकाली काढण्यात आले. त्या तब्बल सव्वा कोटी रुपयांचा दंड वसूल झाला. वाहतूक शाखेकडून वेगवेगळ्या कारणावरुन वाहनचालकांवर कारवाई केली जाते. मात्र, अनेक वाहनचालक या दंडात्मक कारवाईला जुमानत नाही. तेव्हा वाहतूक शाखेकडून त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले होते.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोटार वाहन कोर्ट आणि वाहतूक शाखेच्यावतीन १० हजार खटले या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आले होते. कारवाई झालेल्या वाहनचालकांना त्याची नोटीस बजावली होती. न्यायालयाची नोटीस पाहिल्यावर मात्र वाहनचालकांनी ताबडतोब दंडाची रक्कम भरायला सुरुवात केली व आपला खटला निकाली काढून घेतला. या लोक अदालतीमध्ये एकूण ९ हजार ९९१ केसेस निकाली काढण्यात आल्या. त्यात १ कोटी २२ लाख ५८ हजार ७५० रुपये दंडाची रक्कम जमा करण्यात आली. मोटार वाहन न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस एस पारखे व वरिष्ठ लिपिक आर डी भुरकुंडे यांनी कामकाज पाहिले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आय यु पटेल, डी. सी. आंब्रे, महिला हवालदार व्ही. ए. चिंचाेळकर, पोलीस अंमलदार के.आर. शिंदे, व्ही.के. खोत, महिला पोलीस अंमलदार आर. एच. इनामदार, पी.व्ही.साळवे, एम.आर.राठोड, एस.एस.धोत्रे, एस.एस. विभुते, एस. ए. भोसले, वाय. एम. मोहिते यांनी काम पाहिले.

Web Title: As many as 10,000 cases of transport branch were settled in the people's court; A quarter of a crore fines were collected in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.