Corona Virus Pune: पुणे शहरात 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग' चे तब्बल ११ हजार रुग्ण होते बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 01:43 PM2021-06-01T13:43:07+5:302021-06-01T13:43:13+5:30

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर तसेच आरोग्य विभागाच्या 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग'च्या पथकांनी या रुग्णांचा घेतला शोध

As many as 11,000 contact tracing patients went missing in Pune | Corona Virus Pune: पुणे शहरात 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग' चे तब्बल ११ हजार रुग्ण होते बेपत्ता

Corona Virus Pune: पुणे शहरात 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग' चे तब्बल ११ हजार रुग्ण होते बेपत्ता

Next
ठळक मुद्देकोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत असल्याने यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला होता

पुणे: खासगी रुग्णालये तसेच पालिकेच्या स्वाब सेंटरकडून मिळालेल्या अपुऱ्या माहितीमुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ११ हजारांपेक्षा अधिक रुग्ण 'नॉन ट्रेसेबल' होते. या रुग्णांचा थांगपत्ताच लागत नव्हता. पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर तसेच आरोग्य विभागाच्या 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग'च्या पथकांनी या रुग्णांचा शोध घेतला. या सर्व रुग्णांना निष्पन्न करून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत होते. सक्रिय रुग्णांचा आकडाही ५० हजारांच्या पुढे गेला होता. या काळात आरटीपीसीआर आणि अँटिजेन चाचण्या वाढवण्यात आल्या होत्या. या काळात यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला होता. पालिकेकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात आलेला असला तरी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे या कामात अडचणी येत होत्या. खासगी आणि शासकीय स्वाब चाचणी केंद्रांवर संबंधीत नागरिकांची पुरेशी माहिती घेतली जात नसल्याने अनेक रुग्णांना शोधणे यंत्रणेला कठीण गेले.

चाचणी करणाऱ्या नागरिकांचे पूर्ण नाव, पत्ते, मोबाईल क्रमांक तसेच नातेवाईकांची माहिती न घेतल्याने हे रुग्ण शोधण्यात अडचणी आल्या. अशा प्रकारचे जवळपास ११ हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडतच नव्हते. त्यासाठी पालिकेने यंत्रणा राबवित कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. स्थानिक क्षेत्रीय कार्यालय आणि पालिकेच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेने या रुग्णांचा शोध घेतला. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन कोरोना चाचणी करून घेतली. त्याकरिता 'रिपोर्टिंग सिस्टीम' बसविण्यात आली. तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडील माहिती एकत्रित करण्यास सुरुवात करण्यात आल्याचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी सांगितले.

दुसऱ्या लाटेत दुबार नोंदणी

दुसऱ्या लाटेत ४६१ रुग्ण निगेटिव्ह असताना पॉझिटिव्ह म्हणून त्यांची नोंद झाली. तर, २६४ रूग्णांची पॉझिटिव्ह म्हणून दुबार नोंदणी झाली. या काळात ५ हजार ४५६ रुग्ण 'नॉन ट्रेसेबल' होते. तर, ६ हजार ९२ रुग्णांचा शोध घेणे शिल्लक होते. या सर्व ११ हजार ५४८ रुग्णांचा शोध घेण्यात आला आहे.

Web Title: As many as 11,000 contact tracing patients went missing in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.