कोरोनाचे नियम मोडल्याने ग्रामीण भागात तब्ब्ल १२८ व्यवसाय बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 02:33 PM2021-04-02T14:33:36+5:302021-04-02T14:34:25+5:30

कारवाईसाठी पोलिसांची तीस पथके होती कार्यरत

As many as 128 businesses closed in rural areas due to corona violation | कोरोनाचे नियम मोडल्याने ग्रामीण भागात तब्ब्ल १२८ व्यवसाय बंद

कोरोनाचे नियम मोडल्याने ग्रामीण भागात तब्ब्ल १२८ व्यवसाय बंद

googlenewsNext
ठळक मुद्देआता जिल्ह्यात सर्वत्र कडक निर्बंध

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण कोरोनाचे नियम न पाळल्याने १८ ते २९ मार्चच्या दरम्यान तब्बल १२८ व्यवसायांवर कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी तीस पथकांची नेमणूक करण्यात आली होती. हॉटेल आणि लग्नसमारंभ सोहळ्यात सर्वात जास्त कारवाई झाल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. 

सद्यस्थितीत संपूर्ण पुणे जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन न करता प्रशासनाने कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागात नियमांचे पालन होतंय का नाही. हे पाहण्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात आली होती. बऱ्याच नागरीकांकडून कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र दिसून आले आहे. व्यावसायिक, उद्योजक हे नियमांचे पालन करत नाहीत. नागरिकांनाही सगळ्या गोष्टी करण्याची मुबा देत आहेत. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर झाल्या आहेत. सर्वच स्तरावरून लॉकडाऊनला विरोध होत असल्याने कठोर निर्बंध लागू झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा कार्यरत असणार आहे.  
 

Web Title: As many as 128 businesses closed in rural areas due to corona violation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.