वर्षभरात तब्बल १९२ गुन्हेगार तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:08 AM2021-01-10T04:08:09+5:302021-01-10T04:08:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहर पोलीस दलाने प्रमुख ६ गंभीर गुन्ह्यांमध्ये तब्बल १ हजार २९८ गुन्हेगारांना वर्षभरात अटक ...

As many as 192 criminals were deported during the year | वर्षभरात तब्बल १९२ गुन्हेगार तडीपार

वर्षभरात तब्बल १९२ गुन्हेगार तडीपार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहर पोलीस दलाने प्रमुख ६ गंभीर गुन्ह्यांमध्ये तब्बल १ हजार २९८ गुन्हेगारांना वर्षभरात अटक केली आहे. तर, १९२ गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, जिल्ह्यातून तडीपार केले आहेत.

शहर जसे वाढत जाते तशी तेथील गुन्हेगारी वाढत जाताना दिसते. पुणे शहरातील जुन्या मुख्य शहरातील गुन्हेगारी आता कमी झाल्याचे दिसून येत असून, उपनगरांमध्ये विशेषत: शहराच्या पूर्व भागात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. हडपसर, कोंढवा, वानवडी, मुंढवा, चंदननगर, खराडी, येरवडा, विश्रांतवाडी, विमानतळ, बाणेर, बावधन या वाढत्या उपनगरांमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. या भागातील रहिवाशांना तातडीने पोलीस मदत पुरविता यावी, यासाठी महापालिकेत समाविष्ट केलेला भाग शहर पोलीस दलात घेणे. नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करणे असे प्रस्ताव पुणे पोलिसांकडून पाठविण्यात आले होते. त्याला राज्य शासनाकडून तत्वता मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शहरातील महत्वाच्या गंभीर गुन्ह्यातील सर्व फरार आरोपींना पकडण्यात पोलिसांन यश आले आहे.

........

गंभीर गुन्हे, दाखल गुन्हे, अटक आरोपी

खून ७७ २६५

खुनाचा प्रयत्न ११२ ४२१

जबरी चोरी १७२ २६८

दरोडा ८ ३४

दरोड्याची तयारी २८ १४५

बलात्कार १६९ १६५

............

एकूण ५६६ १२९८

.........

२०२० मध्ये तडीपार १९२

गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न

शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवून बेसिक पोलिसिंगवर आमचा भर आहे. त्या दृष्टीने सातत्याने काेंबिंग ऑपरेशन करून गुन्हेगार चेक करणे. गंभीर गुन्ह्यांबाबत कडक कलमांचा वापर करण्यात येत आहे. गंभीर गुन्हे असणाऱ्या सराईतांवर तडीपार, पीएमडीए ॲक्टखाली स्थानबद्ध करणे अशा कारवाई करण्यात येत आहेत.

अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे.

Web Title: As many as 192 criminals were deported during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.