शहरात आढळले तब्बल ५ हजार ७२० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:11 AM2021-04-04T04:11:05+5:302021-04-04T04:11:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरूच असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. शनिवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरूच असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. शनिवारी तब्बल ५ हजार ७२० रुग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात ३ हजार ७४३ रुग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील ८३७ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ३९ हजार ५१८ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ८३७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ३ हजार ७४३ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ३५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार ४११ झाली आहे. पुण्याबाहेरील ९ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिवसभरात एकूण ३ हजार ७४३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख ३८ हजार ८९० झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख ८३ हजार ८१९ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ३९ हजार ५१८ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २० हजार ६६ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १५ लाख ३९ हजार ८५३ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.