बुधवारी शहरात तब्बल ७४३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:11 AM2021-02-25T04:11:48+5:302021-02-25T04:11:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून, बुधवारी तब्बल ७४३ नवे कोरोनाबाधित आढळून आले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून, बुधवारी तब्बल ७४३ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ गेल्या पाच महिन्यांतील ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे़ दुसरीकडे संशयितांच्या तपासणीचे प्रमाणही शहरात मोठ्या प्रमाणात वाढले असून, आज दिवसभरात ६ हजार ५१४ जणांची तपासणी केली. तपासणीच्या तुलनेत आजच्या रुग्णांची टक्केवारी ११.४० टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरातील विविध रुग्णालयांत ऑक्सिजनसह उपचार घेणा-या कोरोनाबाधितांची संख्या ४१० इतकी आहे. शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २०७ इतकी आहे. तर आज दिवसभरात ३८२ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहे. शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही ३ हजार ५५९ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ११ लाख १४ हजार ६६८ हजार जणांची कोरोना तपासणी केली असून, यापैकी १ लाख ९९ हजार ६९६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९१ हजार ३०० जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १ जण पुण्याबाहेरील आहेत़ आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८३७ जणांचा मृत्यू झाला आहे़