इंदापूर तालुक्यातील भाजपाचे अनेक कार्यकर्ते पक्षातून झाले स्वतंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:12 AM2021-08-15T04:12:50+5:302021-08-15T04:12:50+5:30
इंदापूर : इंदापूर तालुक्यात भाजपा पक्षावर प्रचंड नाराज असलेले उध्दट गावचे अनेक राजकीय कार्यकर्ते एकत्र आले. सर्वांचे एकमत ...
इंदापूर : इंदापूर तालुक्यात भाजपा पक्षावर प्रचंड नाराज असलेले उध्दट गावचे अनेक राजकीय कार्यकर्ते एकत्र आले. सर्वांचे एकमत झाल्यानंतर सर्वांनी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करून भाजपामधून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला स्वतंत्र झाले आहेत.
इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी शनिवारी (दि.१४) रोजी उद्धव गावचे अनेक कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी बोलताना पोपट भोसले म्हणाले की, आमची मागील वीस वर्षांपासून मोठी फसवणूक होत होती. आम्हाला आमच्याच नेत्याने प्रचंड त्रास दिला. त्या त्रासाला कंटाळून उद्धट गावातील आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला असून, सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून येणारे इंदापूर तालुक्याचे लोकनेते राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथून पुढे काम करणार आहोत, असे मत व्यक्त केले.
यावेळी उद्धट गावचे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी संचालक पोपट भोसले, वामन भाऊसो भोसले, उध्दट ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुभाष शिंदे व उद्धट गावचे सामाजिक कार्यकर्ते. प्रवीण भोसले व युवा कार्यकर्ते नितीन लोंढे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
या वेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, शुभम निंबाळकर, अरविंद भोसले, प्रमोद थोरात, राजेंद्र थोरात, ललित इंदलकर, नितीन साळवे, लतिफ आत्ताह, सुमित यादव, अक्षय भोसले, संदीप कुमार, ज्योतीराम काळभोर, प्रदीप भोरात, सागर भोसले, नितीन साळवे, शुभम कुंभार, विशाल भोसले, सार्थक भोरात, विशाल इंगळे, सुरेश चोळ, शाहरुख आतार आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादीमध्ये इनकमिंगचा पूर येणार
इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कामाने जोर धरला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील यांचा जनसंपर्क दांडगा झाला असून, विविध पक्षाचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्कात असून, मोठ्या प्रमाणत राष्ट्रवादीमध्ये इनकमिंगचा पूर येणार आहे, असे सूतोवाच राष्ट्रवादीच्याच मुख्य पदाधिकारी यांनी केले आहे.
इंदापूर तालुक्यातील राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करताना कार्यकर्ते.