पुणे विमानतळ टाकतेय कात, दीड-दोन वर्षांत अनेक सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 03:00 AM2018-05-07T03:00:03+5:302018-05-07T03:00:03+5:30
मागील दोन-तीन वर्षांपूर्वी असुविधांचे आगार असलेले पुणे विमानतळ आता कात टाकू लागले आहे. वेगाने वाढत जाणाऱ्या प्रवासी संख्येसाठी आवश्यक सोयीसुविधांचा विकासही त्याच वेगाने होत आहे. देशात सर्वाधिक वेगाने वाढणा-या प्रवासी संख्येत विमानतळाने तिसरे स्थान मिळविले आहे. नवीन टर्मिनल इमारत, सुसज्ज पार्किंग यांसह विविध कामे प्रस्तावित असल्याने देशपातळीवर पुणे विमानतळाचा डंका वाजू लागला आहे.
पुणे - मागील दोन-तीन वर्षांपूर्वी असुविधांचे आगार असलेले पुणे विमानतळ आता कात टाकू लागले आहे. वेगाने वाढत जाणाऱ्या प्रवासी संख्येसाठी आवश्यक सोयीसुविधांचा विकासही त्याच वेगाने होत आहे. देशात सर्वाधिक वेगाने वाढणा-या प्रवासी संख्येत विमानतळाने तिसरे स्थान मिळविले आहे. नवीन टर्मिनल इमारत, सुसज्ज पार्किंग यांसह विविध कामे प्रस्तावित असल्याने देशपातळीवर पुणे विमानतळाचा डंका वाजू लागला आहे.
पुणे विमानतळ हे लष्कराचे असल्याने तिथून प्रवासी विमानांच्या उड्डाणाला काही मर्यादा आहेत. अपुºया जागेमुळे मागील काही वर्षांत विमानतळावरील सोयीसुविधा मर्यादीतच राहिल्या. त्यामुळे प्रवाशांकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जात होती. हे चित्र मागील दीड-दोन वर्षांपासून बदलू लागले आहे.
सध्या दररोज सुमारे ९० विमानांचे उड्डाण होत असून वार्षिक प्रवासी संख्या सुमारे ८२ लाखांवर पोहचली आहे. २०१४-१५ मध्ये ही संख्या निम्मी होती. प्रवासी संख्येत वेगाने वाढ होत असून मागील तीन-चार वर्षांत दुप्पट झाला आहे. विमानतळावर प्रवाशांचा ताण येत असल्याने विविध उपाययोजना करून प्रवास सुखकर करण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
सुसज्ज बैठकव्यवस्था
विमानतळावरील प्रवासी संख्या वाढली तरी मागील दोन वर्षात बैठक व्यवस्थेची स्थिती जैसे थे होती.
त्यामुळे गर्दीच्या वेळी अनेक प्रवाशांना बसण्यासाठीही जागा मिळत नव्हती.
मात्र, आता सिक्युरिटी
होल्ड एरियामध्ये खुर्च्यांची संख्या ६५० वरून १२०० पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यात आणखी वाढ करण्याचा प्रयत्न आहे.
पुणे विमानतळावरील प्रवाशांसाठी सोयी-सुविधा वाढविण्यासाठी सातत्याने
प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे विमानतळावरून प्रवासी वाहतुक सुरू झाल्यापासून २०१५ पर्यंत जेवढी प्रवासी संख्या होती, तेवढेच प्रवासी मागील तीन वर्षांत वाढले आहेत. विमानतळाची आर्थिक स्थितीही खूप चांगली आहे. प्रवासीही समाधान व्यक्त करत असून यामध्ये पुणे तिसºया स्थानावर आहे. आता प्रवासी संख्या एक कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.
- अजय कुमार,
संचालक, पुणे विमानतळ