उद्योग, व्यवसायामध्ये महिलांना अनेक संधी : कापरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:15 AM2021-08-27T04:15:52+5:302021-08-27T04:15:52+5:30

पेरणे (ता. हवेली) येथे सावित्री महिला प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी ...

Many opportunities for women in industry and business: Kapare | उद्योग, व्यवसायामध्ये महिलांना अनेक संधी : कापरे

उद्योग, व्यवसायामध्ये महिलांना अनेक संधी : कापरे

Next

पेरणे (ता. हवेली) येथे सावित्री महिला प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी विविध पद नियुक्ती करण्यात आली. या वेळी कापरे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संत शिरोमणी सावता महाराज वंशज ह.भ.प. रमेश वसेकर होते. यावेळी सावित्री महिला प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्षा कांताताई पांढरे, पंचायत समिती माजी उपसभापती हेमंलता बढेकर, पंचायत समिती सदस्या शरदराव रासकर, शैलेश पांढरे, उमेश लोखंडे, श्रीमंत झुरुंगे, ज्ञानदेव झुरुंगे, बबलु झुरुंगे, अनिता खेडे, विद्या लोखंडे आदी उपस्थित होते.

या वेळी नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, ती अशी- कार्यध्यक्षा - हेमलता बढेकर, पुणे जिल्हा अध्यक्षा अरुणा रासकर, प्रदेश सचिव- अनिता खेडे, पुणे शहर अध्यक्ष- मनीषा कापरे, हवेली तालुका अध्यक्षा- निर्मला झुरुंगे, दौंड तालुका अध्यक्षा - विद्या लोखंडे, हवेली तालुका अध्यक्ष शीतल कापरे. तसेच सृष्टी स्मार्ट फार्मस कंपनीच्या सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प, गांडूळ खत याचे उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन शरदराव रासकर माळी यांनी केले. शैलेश पांढरे यांनी आभार मानले.

--

फोटो २६ लोणीकंद पेरणे सावित्री महिला प्रतिष्ठान

फोटो ओळी : सावित्री महिला प्रतिष्ठानच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देताना कांताबाई पांढरे.

Web Title: Many opportunities for women in industry and business: Kapare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.