स्वस्तात फ्लॅट देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक
By Admin | Published: April 9, 2015 05:10 AM2015-04-09T05:10:24+5:302015-04-09T05:10:24+5:30
स्वस्तात फ्लॅट विकण्याच्या आमिषाने अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या ठगांना आज चाकण येथून अटक केली असून त्यांच्याकडून
चाकण : स्वस्तात फ्लॅट विकण्याच्या आमिषाने अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या ठगांना आज चाकण येथून अटक केली असून त्यांच्याकडून दोन दुचाकी हस्तगत केल्या असल्याची माहिती विमानतळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप कोलते यांनी दिली.
या दुचाकी चोरट्याने एका गृहप्रकल्पातील फ्लॅटधारकाचे इण्टेरिअरचे काम घेतले होते. त्याच्या पार्किंगमध्ये या दुचाकी सापडल्या. अंकुश बबन वडे ऊर्फ नितीन सूड (वय २९, रा. पालघर), योगेश रघुनाथ करांडे ऊर्फ युवराज राजाराम गडकरी (वय ३१, रा. हडपसर) आणि आकाश ऊर्फ विक्रांत उमेश पाटील (वय २२, रा. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार स्वरूप शर्मा ऊर्फ राज शुक्ला ऊर्फ सूरज राकेश चौबे आणि रोहन पाटील फरारी झाले आहेत. शर्माने मुंबईतही अनेकांची फसवणूक केली आहे. त्याच्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अटक आरोपींना ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त श्याम मोहिते यांनी दिली.
रजिस्ट्रेशनसाठी काही जन इंजिनिअर विमाननगर येथील कंपनीत आले असता, आॅफिस बंद असल्याचे दिसून आले. चौकशी केली असता कंपनीने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिस निरीक्षक संजय कुरुंदकर, विठ्ठल दरेकर यांच्या मार्गदर्शनखाली सहायक निरीक्षक प्रताप कोलते, पोलीस कर्मचारी उसुलकर, चंद्रकांत जाधव, नवनाथ वाळके, अविनाश संकपाळ, अमित जाधव, प्रियांका वाघोले यांच्या पथकाने आरोपींना पकडण्यात मोलाची कामगिरी बजावली. (वार्ताहर)