आयुष्यमान भारत योजनेला अनेक खासगी रूग्णालयाकडून ठेंगा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 11:40 AM2019-08-19T11:40:18+5:302019-08-19T11:47:36+5:30

पुणे शहरातील बहुतेक खासगी रुग्णालयाने योजनेकडे पाठ फिरवली आहे. 

Many private hospitals will no support the life-long Bharat Yojana | आयुष्यमान भारत योजनेला अनेक खासगी रूग्णालयाकडून ठेंगा 

आयुष्यमान भारत योजनेला अनेक खासगी रूग्णालयाकडून ठेंगा 

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातील केवळ दीड लाख कुटुंबांना योजनेच्या स्मार्ट कार्डचे वाटपआयुष्यमान भारत योजना सुरु ही २०१८ मध्ये सुरु

- सुषमा नेहरकर-शिंदे- 
पुणे : लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने अत्यंत गाजावाजा करत आरोग्यासाठी ‘आयुष्यमान भारत योजना’ सुरु केली. या योजनेमुळे सर्वसामान्य व गरिब कुटुंबातील नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये तब्बल ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत करण्यात येणार आहेत. यासाठी तातडीने मोहिम हाती घेऊन पुणे शहरातील तब्बल १ लाख ३१ हजार ४०५ कुटुंबांना योजनेच्या कार्डचे वाटप देखील करण्यात आले. योजना सुरु होऊन एक वर्षांच्या कालावधी लोटला असून, पुणे शहरातील बहुतेक खासगी रुग्णालयाने योजनेकडे पाठ फिरवली आहे. 
आयुष्यमान भारत योजना सुरु ही २०१८ मध्ये सुरु केली. या योजनेतून एका कुटुंबाला पाच लाख रुपये विमा संरक्षण देण्यात येणार आहे. लाभार्थी कुटुंबातील व्यक्तींना कोणत्याही आजारांवर देशाच्या कुठल्याही भागातल्या रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत. यासाठी प्रत्येक पात्र लाभार्थी कुटुंबाला स्मार्ट कार्डचे वाटप केले. यामध्ये देशात २०११ मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) लाभार्थ्यांची यादी तयार केली. यात ज्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे अशा सर्व कुटुंबाचा आयुष्यमान भारत योजनेत समावेश केला आहे.
    लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपने सर्व शासकीय यंत्रणांना हाताशी धरुण स्वतंत्र कॅम्प घेऊन आयुष्यमान भारत योजनेच्या स्मार्ट कार्डचे शहरातील पात्र लाभार्थ्यांना वाटप केले. यामध्ये देखील निवडणुकीसाठी मोदी सरकारने तुमच्या कुटुंबाला तब्बल ५ लाख रुपया पर्यंत मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिली असून, मतदानासाठी नक्की घराबाहेर पडा सांगत ‘एक लाभार्थी एक मतदान’ अशी खास मोहिमच हाती घेतली होती. आता विधानसभा निवडणुकीसाठी देखील मोदी सरकारच्या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांना टार्गेट करण्याचे भाजपने नियोजन केले आहे. 
--------------
आयुष्यमान योजने अतंर्गत उपचार 
मोदी सरकारने योजनेची घोषणा करताना देशातील सर्व गरिब व सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये मोफात उपचार उपलब्ध होणार असल्याचे म्हटले हाते. खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार केल्यानंतर विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी आयुष्मान मित्र मदत करतील. रुग्ण भरती करुन घेण्यापासून ते त्याला विम्याची रक्कम मिळवून देण्यापर्यंतची जबाबदारी आयुष्मान मित्राची राहणार आहे. परंतु अद्याप असे आयुष्यमान मित्राची नियुक्ती झाली नसून, एकाही खाजगी रुग्णालयामध्ये या अतंर्गत उपचार सुरु झाले नाहीत. 
---------------------------------
सध्या या रुग्णालयांमध्ये मिळातत आयुष्यमान भारत योजनेचे लाभ
- केअर रुग्णालय, केसनंद,
- नोबल रुग्णालय, हडपसर
- सह्याद्री रुग्णालय, कर्वेरोड
- सुर्या सह्याद्री हॉस्पीटल, शनिवारवाड्या शेजारी
- ससून जनरल रुग्णालय, शासकीय रुग्णालय
--------------------------------------

Web Title: Many private hospitals will no support the life-long Bharat Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.