तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांना मिळाले सवलतीचे गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:09 AM2021-07-17T04:09:44+5:302021-07-17T04:09:44+5:30

पुणे : शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय गायन, शास्त्रीय वाद्य वादन, लोककला, नाटक, चित्रकला, क्रीडा, एन.सी.सी आणि स्काऊट गाइड या विविध ...

As many as two lakh students got concession marks | तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांना मिळाले सवलतीचे गुण

तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांना मिळाले सवलतीचे गुण

Next

पुणे : शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय गायन, शास्त्रीय वाद्य वादन, लोककला, नाटक, चित्रकला, क्रीडा, एन.सी.सी आणि स्काऊट गाइड या विविध प्रकारात विद्यार्थ्यांना गुण दिले जातात. यंदा दहावीच्या निकालात राज्यातील तब्बल २ लाख २ हजार ९१७ विद्यार्थ्यांना या विविध कला-क्रीडा प्रकारात सवलतीचे गुण मिळाले आहेत.

पुणे विभागातील विद्यार्थ्यांची संख्या ४५ हजार ७६२ इतकी सर्वाधिक आहे. त्याखालोखाल कोल्हापूर ४२ हजार १८४, मुंबई ३६ हजार १५९, नाशिक २५ हजार ८७४, अमरावती १४ हजार १३, औरंगाबाद १३ हजार ७७३, लातूर ९ हजार ९२४, कोकण ९ हजार ९३० अशी विद्यार्थी संख्या आहे. सर्वांत कमी नागपूर विभागात ५ हजार २९८ आहेत.

चौकट

गायन, वादन, कला, क्रीडा

पुणे विभागात शास्त्रीय नृत्य (५२९), शास्त्रीय गायन (३४३), शास्त्रीय वाद्य वादन (४२२), लोककला (६२६), नाटक (३४), चित्रकला (३९,९८७), क्रीडा (३७४४), एन.सी.सी (०), आणि स्काऊट गाइड (७७) असे एकूण ४५ हजार ७६२ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळाले आहेत.

चौकट

काेल्हापूर विभाग दुसरा

कोल्हापूर विभागात शास्त्रीय नृत्य (१५४), शास्त्रीय गायन (७१), शास्त्रीय वाद्य वाजवणे (१४४), लोककला (१२४२४), नाटक (३४), चित्रकला (३९९८७), क्रीडा (३७४४) आणि स्काऊट गाइड (७७) अशी एकूण ४२ हजार १८४ इतकी विद्यार्थी संख्या आहे.

चौकट

नागपूर विभागात सर्वांत कमी

नागपूर विभागात शास्त्रीय नृत्य (३४), शास्त्रीय गायन (१११), शास्त्रीय वाद्य वाजवणे (८१), लोककला (०), नाटक (१), चित्रकला (२७३७१), क्रीडा (२००) आणि स्काऊट गाइड (१९४) असे एकूण ५ हजार २९८ इतके राज्यातले सर्वात कमी विद्यार्थी आहेत.

Web Title: As many as two lakh students got concession marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.