मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे मनुवादी आहेत : लक्ष्मण माने

By भाग्यश्री गिलडा | Published: January 24, 2024 06:45 PM2024-01-24T18:45:59+5:302024-01-24T18:46:24+5:30

पुणे : महाराष्ट्रात मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आरक्षणासाठी राज्यभर दौरे ...

Maratha activist Manoj Jarange-Patil is a humanist: Laxman Mane | मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे मनुवादी आहेत : लक्ष्मण माने

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे मनुवादी आहेत : लक्ष्मण माने

पुणे : महाराष्ट्रात मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आरक्षणासाठी राज्यभर दौरे करत आहेत. एकीकडे त्यांची पुण्यात पदयात्रा सुरू असताना दुसरीकडे ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी मनोज जरांगे-पाटलांवर टीका केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना लक्ष्मण माने म्हणाले, ‘मनोज जरांगे पाटील हे मनुवादी आहेत. त्यांच्या कार्यक्रमात एकाही ठिकाणी शाहू, फुले, आंबेडकरांचा फोटो नसतो. शिवाजी महाराजांचा फोटो असतो, पण तेही त्यांना कळाले नाहीत. जे मनुवादी आहेत त्यांना आरक्षण देऊ नये. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आरक्षण देत होते, तेव्हा या लोकांनी मिशा वर पिळल्या होत्या. मनुवादी विचार डोक्यात होता म्हणून त्यांनी आरक्षण नाकारले. पंजाबराव देशमुखांनी आरक्षण घेतले, त्यामुळे विदर्भ व कोकणातील लोकांना कुणबी आरक्षणाचा लाभ मिळाला. गरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे, त्याला आमचा विरोध नाही, मात्र त्यांना आमच्या ताटातले देऊ नका, त्यांना वेगळे आरक्षण द्या. आम्ही भिकारीच आहोत. ते भिकारी का झाले, याचा विचार त्यांनी करावा. सध्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांच्या हाताखाली काम करावे लागते, असे तुच्छतेने म्हणता तर मग आमच्यात का आरक्षण मागता? असाही सवाल लक्ष्मण माने यांनी उपस्थित केला.

Web Title: Maratha activist Manoj Jarange-Patil is a humanist: Laxman Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.