मराठा समाजाला आता आक्रमक भूमिका घ्यावी लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:09 AM2021-06-21T04:09:30+5:302021-06-21T04:09:30+5:30

लोणीकंद : मराठा समाजाचे आरक्षण सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे न्यायालयात टिकले नाही. त्यांच्या चुका टाळून ते आता केंद्राकडे बोट ...

The Maratha community will now have to take an aggressive stance | मराठा समाजाला आता आक्रमक भूमिका घ्यावी लागेल

मराठा समाजाला आता आक्रमक भूमिका घ्यावी लागेल

Next

लोणीकंद : मराठा समाजाचे आरक्षण सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे न्यायालयात टिकले नाही. त्यांच्या चुका टाळून ते आता केंद्राकडे बोट दाखवत आहेत. केंद्र सरकारचा संबंध येतो कुठे ? आघाडी सरकार नुसते कारणे देत असून, ते आरक्षण देऊ शकत नाही. आता मूक मोर्चे काढून जमणार नाही. आरक्षण मिळण्यासाठी आता आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे असे मत आमदार नीतेश राणे यांनी वक्त केले.

श्री क्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे शौर्यपीठावर मराठा आरक्षणावर संवाद आणि चर्चा आयोजित केली होती. या वेळी आमदार राणे बोलत होते. या वेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रम पाटील, उपाध्यक्ष अनुप मोरे, जिल्हा परिषाद सदस्या अंकिता पाटील आदी उपस्थित होते.

राणे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे राज्यातून निघाल्यानंतर आरक्षाण मिळाले नाही. चर्चा बैठका- आश्वासने खूप झाली. मुख्यमंत्री तर काही कामाचे नाही. त्याचे आश्वासन मृगजळ ठरत आहेत. उठ-सूट केंद्राकडे बोट दाखवून महाराष्ट्र सरकार रडायला लागले आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्याला पहिल्या नंबरात आघाडी सरकारणे बसविले आहे अशी टीका राणे यांनी केली.

मराठी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शेतकरी कर्जमाफी, शिवस्मारक, अण्णासाहेब पाटील महामंडळ पुनर्जीवित करणे, सारथीला मदत या चर्चा आता बास झाल्या. आता फक्त आरक्षण पाहिजे. मराठा समाजावर कोणीही बोलतो, लिहितो काय चाललेय हे ? आरक्षण मिळाले नाही तर एकही मंत्री रस्त्यावर फिरणार नाही असा इशारा ही त्यांनी दिला. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुटे, माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवले, रुपेश शिवले, संतोष शिवले, अमोल शिवले, राहुल राऊत, पवन खैरे, रमेश शिवले, शिवाजी शिवले, वंदना शिवले आदी उपस्थित होते.

संयोजक शेखर पाटील यांनी स्वागत व प्रास्तविक केले.

Web Title: The Maratha community will now have to take an aggressive stance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.