सकल मराठा क्रांती महामोर्चाच्या वतीने २९ सप्टेंबरला लाक्षणिक उपोषण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 02:44 PM2018-09-22T14:44:45+5:302018-09-22T14:50:25+5:30

महाराष्ट्रातील मराठा समाज पुणे येथील बालचित्रवाणी स्थित छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास (सारथी ) संस्थेत एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास बसणार आहेत.

Maratha Kranti Mahamorcha one day uposhan on September 29 | सकल मराठा क्रांती महामोर्चाच्या वतीने २९ सप्टेंबरला लाक्षणिक उपोषण 

सकल मराठा क्रांती महामोर्चाच्या वतीने २९ सप्टेंबरला लाक्षणिक उपोषण 

googlenewsNext
ठळक मुद्देडॉ.सदानंद मोरे यांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी करून त्यांच्याजागी सक्षम व्यक्तीची नेमणूक करण्याची मागणी

पुणे : महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या वतीने असंख्य मोर्चे,आंदोलने,उपोषणे,धरणे आंदोलन अत्यंत शांततेत करून आपल्या मागण्या सरकारी दरबारी ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु, शासनाच्या वतीने याकडे गंभीरपणे लक्ष देण्यात आले नाही. याच अनुषंगाने दिनांक २९ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ९ पासून महाराष्ट्रातील मराठा समाज पुणे येथील बालचित्रवाणी स्थित छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास (सारथी ) संस्थेत एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास बसणार आहेत. याबाबत माहिती दिलेल्या माहितीनुसार, ३० मे २०१७ ते ४ जून २०१७ च्या दरम्यान मराठा समाजाच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले होते. यामध्ये शासनाच्या वतीने गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशानुसार एक लेखी आश्वासन दिले होते. त्यामध्ये सारथी संस्था येत्या जुलै २०१७ पर्यंत कार्यान्वित करण्यात येईल असे नमूद केले होते. मात्र, आज वर्ष उलटून गेले तरी संस्थेचा आराखडा तयार नाही. तसेच फक्त उदघाटन सोहळा सोडला तर दुसरी कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यानंतर शासनाच्या वतीने दिलेले लेखी आश्वासन पूर्ण न केल्याने मराठा समाजाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्री यांच्यावर मराठा समाजाची फसवणूक केल्याची तक्रार करून २९ आॅक्टोबर २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार केल्याच्या नंतर डॉ.मनोजकुमार शर्मा यांच्या विनंतीनुसार, गृहराज्यमंत्री यांच्याशी बैठक घेऊन समाजाच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील असे आश्वासन दिले होते. तेही आश्वासन पूर्ण केले गेले नाही. तसेच मराठा समाजाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बार्टीच्या धरतीवर छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानवविकास संस्था (सारथी) घोषित केली होती. त्यानंतर 2 वर्षाच्या वरचा कालावधी उलटून गेला तरी संस्थेचे प्रत्यक्ष कामकाज तर सोडाच परंतु अजून मुख्य कार्यालय सुद्धा सुरू झालेले नाही. या संस्थेवर अध्यक्ष म्हणून नेमले गेलेले डॉ.सदानंद मोरे यांनी मागील 2 वर्षीच्या काळात कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका न घेता दिशाभूल करण्याचे काम केले असल्यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी आहे.आणि याच अनुषंगाने डॉ.सदानंद मोरे यांना त्यांच्या पदावरून हकालपट्टी करून त्यांच्याजागी सक्षम अशा व्यक्तीची नेमणूक करण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे. त्याच बरोबर मराठा विद्यार्थ्यांनासाठी जे वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केली गेली होती. ते तत्काळ प्रत्येक जिल्हास्तरावर सुरू करून इतर मागासवर्गीय वसतिगृह ज्या पद्धतीने शासनाच्या वतीने चालविले जातात. त्याचप्रमाणे हेही वसतिगृह चालविण्यात यावेत. मराठा युवकांवर आंदोलनादरम्यान दाखल झालेले खोटे तत्काळ मागे घेण्यात यावेत व मराठा आंदोलनादरम्यान ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण नाही म्हणून आत्महत्या केल्यात अशा सर्वांच्या नातेवाईकांना तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी. या प्रमुख मागण्यांसाठी हे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून यापुढील समाजाची व आंदोलनाची दिशा उपोषण स्थळी ठरविण्यात येणार असल्याचे प्रा, संभाजी पाटील यांनी माहिती सांगितली  आहे. 

Web Title: Maratha Kranti Mahamorcha one day uposhan on September 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.