मराठा क्रांती मोर्चा काढणार पुणे ते जालना 'संघर्ष यात्रा' ; आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 01:26 PM2021-02-02T13:26:07+5:302021-02-02T13:36:15+5:30

मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका दुटप्पी, मराठा क्रांती मोर्चाचा गंभीर आरोप..

Maratha Kranti Morcha to launch 'Sangharsh Yatra' from Pune to Jalna; The fight for reservation will intensify | मराठा क्रांती मोर्चा काढणार पुणे ते जालना 'संघर्ष यात्रा' ; आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करणार

मराठा क्रांती मोर्चा काढणार पुणे ते जालना 'संघर्ष यात्रा' ; आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करणार

googlenewsNext

पुणे : मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या दोन दिवसांच्या संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही संघर्ष यात्रा ४ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पुष्पहार अर्पण करुन यात्रेला सुरुवात होईल. आणि पुढे शिवाजीनगरमार्गे नगररोड ,वाघोली, शिक्रापूर, अहमदनगर, अमळनेर, बीडमार्गे 5 फेब्रुवारी रोजी जालन्याला पोहचणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे. 

पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघर्ष यात्रेची घोषणा केली आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला राजेंद्र कोढंरे , रघुनाथ चित्रे पाटील, राजेंद्र कुंजीर,सचिन आडेकर, नाना निवंगुने ,हानुमंत मोटे,अनिल ताडगे,धनंजय जाधव,मीना जाधव, प्राची दुधाने,दिपाली पाडाळे, किशोर मोरे,यांसह समन्वयक उपस्थित होते. मराठा आरक्षणाबाबत सरकारची भुमिका दुटप्पी असून न्यायालयामध्ये त्याला स्थगिती मिळाली आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार असून आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी पुणे ते साष्ट पिंपळगाव असा मराठा संघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली आहे, असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

मराठा मुलांच्या नोकर्‍यांच्या नियुक्त्या प्रलंबित असून मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश लटकले. सारथी बंद पाडली. त्यामुळे आपण परत एकवेळ एकजुट दाखविणे गरजेचे आहे. मराठा समाजाची ताकद राज्यकर्त्यांना दाखवावी लागेल. आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार राज्यकर्त्यांना नसल्याने आपल्यालाच विचार करावा लागेल. जालना जिल्ह्यातील साष्ठ पिंपळगावातील मराठ्यांनी जो ठिय्या आंदोलनातुन संघर्ष सुरु केला आहे, त्यांना पाठिंबा देवुन या लढ्याला बळकटी देण्यासाठी मराठा बांधवांनी या संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांनी केले आहे.

Web Title: Maratha Kranti Morcha to launch 'Sangharsh Yatra' from Pune to Jalna; The fight for reservation will intensify

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.