मराठा-ओबीसी आरक्षण सरकारच्या निष्क्रियतेमुळे गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:08 AM2021-06-23T04:08:05+5:302021-06-23T04:08:05+5:30
-- खोर : आज अनेक समाज आपल्या आरक्षणाच्या मागण्या घेऊन सरकारी दरबारी बसला आहे. मात्र, आजपर्यंत कोणत्याही समाजाला अजूनही ...
--
खोर : आज अनेक समाज आपल्या आरक्षणाच्या मागण्या घेऊन सरकारी दरबारी बसला आहे. मात्र, आजपर्यंत कोणत्याही समाजाला अजूनही आरक्षण देण्यास सरकारला यश आले नसून केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळेच मराठा- ओबीसी समाजाचे आरक्षण हिरावून घेतले असल्याची टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
बहुजन समाजाच्या हक्कासाठी व खितपत पडलेल्या समाजाच्या मागण्या जाणून घेण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी दौंड तालुक्याचा दौरा आयोजित केला होता त्या प्रसंगी गोपीचंद पडळकर बोलत होते.
पडळकर म्हणाले की, हे महाराष्ट्र सरकार हे गोरगरिबांना शाप देणारे सरकार असून हे मुघलांचे सरकार आहे. त्यांना कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत गांभीर्य राहिले नाही. बहुजन समाजात आज अनेक जाती आहेत. सर्वच समाज आज आरक्षणाच्या मुद्द्यावर पेटून उठला आहे. मात्र, राज्य सरकार याबाबत कोणतीच ठाम भूमिका घेत नसून केवळ या समाजाचा राजकारण म्हणून उपयोग करून घेत असल्याचे दिसत आहे. आजपर्यंत कोणत्याच समाजाला या सरकारने न्याय देण्याचे काम केले नाही ही मोठी खंत आहे.
याप्रसंगी दौंडचे आमदार राहुल कुल, भीमा पाटसचे संचालक विकास शेलार, भाजपचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, यावेळी नाभिक समाजाचे दौंड तालुका अध्यक्ष गणेश साळुंके उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : २२
फोटोओळ : नाभिक समाजाचे दौंड तालुका अध्यक्ष गणेश साळुंके यांनी नाभिक समाजाची लॉकडाऊनच्या काळात होत असलेली होरपळ पडळकर यांच्या पुढे मांडत नाभिक समाजाच्या प्रश्नांच्या संदर्भातील निवेदन यावेळी देण्यात आले. (छायाचित्र : रामदास डोंबे)