मराठा क्रांती मोर्चाने अध्यादेशाची केली होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:10 AM2020-12-25T04:10:45+5:302020-12-25T04:10:45+5:30

पुणे : ‘मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे...’, ‘या सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय...’, ‘एक मराठा ...

The Maratha Revolutionary Front passed the ordinance on Holi | मराठा क्रांती मोर्चाने अध्यादेशाची केली होळी

मराठा क्रांती मोर्चाने अध्यादेशाची केली होळी

Next

पुणे : ‘मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे...’, ‘या सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय...’, ‘एक मराठा लाख मराठा...’ अशा घोषणा देत सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चातर्फे महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी सरकारने काढलेल्या अध्यादेशाची होळी करण्यात आली.

मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे, रघुनाथ चित्रे पाटील, राजेंद्र कुंजीर, सचिन आडेकर, महेश टेळे, किशोर मोरे, मीना कुंजीर, गणेश मापारी, श्रृतिका पाडाळे उपस्थित होते. राज्य सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात सरकारच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली.

रघुनाथ चित्रे-पाटील म्हणाले की, सरकार मराठा समाजातील काही ठराविक लोकांना गाजर दाखवून हाताशी धरून फूट पाडण्याचे कारस्थान करीत आहेत. परंतु, मराठा समाजाचे सुरुवातीपासूनचे आंदोलनातील लोक एकत्र आहेत. चार जणांना हाताशी धरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणे, जी मराठा समाजाची मागणीच नाही ती मराठा समाजावर थोपवणे, ही बाब चुकीची आहे. गेल्या ३० वर्षापासूनच्या मागणीवर अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण मराठा समाजातीलच काही नेते करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

राजेंद्र कुंजीर यांनी सांगितले, की या सरकारने मराठा समाजाशी रडीचा डाव खेळून डावपेच केले आहेत. हे आगामी काळात समजून देणार आहोत. त्याचबरोबर मराठा समाजात जनजागृती, साक्षरता करुन देऊन संघर्षाची तयारी करणार आहोत.

----------

‘हा तर मराठा आरक्षणाचा खून’

आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन करून दिलेल्या आरक्षणाला आव्हान देण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये समाजाला आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून (इडब्ल्यूएस) आरक्षण दिल्यास मराठा आरक्षणाच्या घटनापीठासमोरील अंतिम सुनावणीमध्ये युक्तिवाद करताना कायदेशीर अडचणी निर्माण होणार आहेत. राजकीय सोयीनुसार हा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित ईसीबीसी केसचा पाया खिळखिळा करण्यासाठीच असा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा हा खून आहे, असा आरोप राजेंद्र कोंढरे यांनी केला.

Web Title: The Maratha Revolutionary Front passed the ordinance on Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.