मराठा तरुणांना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; काय आहे योजना ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 10:45 AM2022-10-31T10:45:22+5:302022-10-31T10:45:47+5:30

व्यवसायासाठी इच्छुक तरुणांना या योजनेचा मोठा लाभ मिळू शकतो...

Maratha youth will get interest-free loans for business; what is the plan | मराठा तरुणांना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; काय आहे योजना ?

मराठा तरुणांना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; काय आहे योजना ?

Next

पुणे : केवळ नोकरीवर अवलंबून न राहता, तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि त्याकरिता त्यांना विनासायास अर्थसाह्य मिळावे, याकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे १० हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची योजना जाहीर झालेली आहे. व्यवसायासाठी इच्छुक तरुणांना या योजनेचा मोठा लाभ मिळू शकतो.

सरकारच्या या कर्जयोजनेमुळे मराठा तरुणांचे उद्योजक बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

काय आहे योजना ?

ही योजना मराठा समाजातील तरुणांसाठी आहे. या योजनेकरिता १० हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम तरुणांना व्यवसायासाठी कर्जापोटी मिळेल. विशेष म्हणजे, या योजनेकरिता देण्यात येणाऱ्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. बिनव्याजी अशी ही कर्ज योजना आहे.

आधी दहा हजार, ५० हजार, नंतर १ लाख

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांना सर्वप्रथम १० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. कर्जापोटी देण्यात येणाऱ्या रकमेचा वापर त्यांनी कसा केला आहे, हे तपासतानाच त्या कर्जाची परतफेड नियमित केली असेल तर पुढच्या टप्प्यांत त्यांना ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम कर्जापोटी मिळेल. या ५० हजार रुपयांच्या कर्जाचीदेखील नियमित कर्जफेड केली तर त्यापुढील टप्प्यांत या तरुणांना एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम कर्जापोटी मिळू शकेल.

अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता ?

  • आधार कार्ड
  • रहिवासी पुरावा
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र

परतफेड प्रतिदिन १० रुपये

१. जेव्हा तरुणांना सर्वप्रथम १० हजार रुपयांचे कर्ज मिळेल, तेव्हा या कर्जाची परतफेड प्रति दिन १० रुपये याप्रमाणे करावी लागेल.

२. ५० हजार रुपये इतकी होईल, त्यावेळी या तरुणांना कर्जाची परतफेड प्रतिदिन ५० रुपये याप्रमाणे करावी लागेल

३. ५० हजार रुपयांवरून जेव्हा कर्जाची मर्यादा एक लाख रुपये इतकी वाढेल, त्यावेळी कर्जाची परतफेड करताना या तरुणांना प्रतिदिन १०० रुपये याप्रमाणे परतफेड करावी लागेल. यासाठी वयोमर्यादा ६० वर्षे करण्यात आलेली आहे,

अर्ज कुठे करायचा? :

या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येईल.

Web Title: Maratha youth will get interest-free loans for business; what is the plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.