मराठी कलाकारांनी मानले पोलिसांचे आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:08 AM2021-04-29T04:08:24+5:302021-04-29T04:08:24+5:30
यासाठी पोलीसही विविध माध्यमातून समाज प्रबोधन करीत आहेत. अभिनेते राहुल सोलापूरकर, आनंद इंगळे, माधव अभ्यंकर, अक्षता देवधर, मृण्मयी देशपांडे, ...
यासाठी पोलीसही विविध माध्यमातून समाज प्रबोधन करीत आहेत. अभिनेते राहुल सोलापूरकर, आनंद इंगळे, माधव अभ्यंकर, अक्षता देवधर, मृण्मयी देशपांडे, अमेय वाघ, संस्कृती बालगुडे, आदी कलाकारांनी पोलिसांचे आभार मानले. पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी कलाकारांचे स्वागत केले.
कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये,असे आवाहन पोलिसांकडून वारंवार करूनही काही नागरिक विनाकारण फिरताना दिसून येत असल्याने पोलिसांनी नाकाबंदी करीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करीत आहेत. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, नागरिकांनी घराबाहेर पडू नये,
कोट:
वर्दीच्या आतमध्ये पोलीसही माणूसच आहे. तरीही तो नियम पाळण्यासाठी आपणास मदत करत आहेत. पोलीस स्वतः रिस्क घेऊन आपल्यासाठी रस्त्यावर उभा आहे. पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी तसेच धन्यवाद देण्याकरिता आम्ही आलो आहोत.
- राहुल सोलापूरकर, अभिनेता
आज सर्व मराठी कलाकारांनी आम्हा पोलिसांची आस्थेने चौकशी करून मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला. सेलिब्रिटींना भेटल्यामुळे कर्मचाऱ्यांत एकप्रकारचा उत्साह निर्माण झाला आहे. यांमुळे कामातील ऊर्जा टिकून राहते.
- देविदास घेवारे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रस्ता पोलीस ठाणे
फोटो ओळ: मराठी कलाकारांनी पोलिसांना धन्यवाद देत त्यांचे आभार मानले.