मराठीच्या चाचणीत मराठी मुले नापास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 05:02 AM2018-03-16T05:02:57+5:302018-03-16T05:02:57+5:30
रिझर्व्ह बँक सहायक लिपिक पदाच्या मुंबईतील २६४ जागांसाठी आॅक्टोबर २०१७मध्ये घेतलेल्या परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप मराठी परीक्षार्थींनी केला आहे.
- राहुल गायकवाड
पुणे : रिझर्व्ह बँक सहायक लिपिक पदाच्या मुंबईतील २६४ जागांसाठी आॅक्टोबर २०१७मध्ये घेतलेल्या परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप मराठी परीक्षार्थींनी केला आहे. पहिल्या २ फेऱ्यांमध्ये पास झालेल्या ३००हून अधिक मराठी परीक्षार्थींना मराठी भाषेच्या चाचणीत नापास करण्यात आले आहे. मात्र अमराठी मुलांना पास करण्यात आले आहे.
या परीक्षेचा पहिला आणि दुसरा टप्पा आईबीपीएस आणि आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आला. दुसºया टप्प्यातून ६६६ परीक्षार्थींची निवड करण्यात आली. त्यानंतर १८ फेब्रुवारी २०१८ रोजी परीक्षार्थींना मराठी भाषा लिहिता- वाचता येते का, याची चाचणी घेण्यात आली. त्यात प्रत्यक्षात किती गुण आहेत हेही सांगण्यात आले नव्हते. या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला असून त्यात सुमारे २५० ते ३०० मराठी भाषिक परीक्षार्थींना नापास करण्यात आले आहे.
या परीक्षेला बसलेल्या पूनम आंबोरे म्हणाल्या, पहिल्या दोन परीक्षांमध्ये मी चांगल्या गुणांनी पास झाले आहे. तिसरी परीक्षा ही फक्त उमेदवाराला मराठीचे किती ज्ञान आहे यासाठी होती.