Video: खेड तालुक्यातील बैलगाडा शर्यतीत नाचल्या मराठमोळ्या चिअर गर्ल्स; रंगतदार प्रकाराची सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 04:03 PM2022-04-04T16:03:45+5:302022-04-04T16:04:40+5:30

न्यायालयीन बंदी नंतर काही वर्षांनी सुरू झालेल्या बैलगाडा शर्यतीना ग्रामीण भागात अनेक अर्थानी महत्त्व प्राप्त झाले आहे

Marathi cheer girls dancing in bullock cart race in Khed taluka | Video: खेड तालुक्यातील बैलगाडा शर्यतीत नाचल्या मराठमोळ्या चिअर गर्ल्स; रंगतदार प्रकाराची सर्वत्र चर्चा

Video: खेड तालुक्यातील बैलगाडा शर्यतीत नाचल्या मराठमोळ्या चिअर गर्ल्स; रंगतदार प्रकाराची सर्वत्र चर्चा

Next

राजगुरूनगर : न्यायालयीन बंदी नंतर काही वर्षांनी सुरू झालेल्या बैलगाडा शर्यतीना ग्रामीण भागात अनेक अर्थानी महत्त्व प्राप्त झाले आहे. स्पर्धक बैलगाडा मालकांबरोबर आयोजकांमध्ये सुद्धा उत्साहाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर पांगरी,ता खेड येथे आयोजकांनी शर्यतीचा उत्साह वाढवा या हेतुने बैलगाडा घाटात चिअर गर्ल्स आणुन शर्यतीत रंगत आणली. या अनोख्या पण रंगतदार प्रकाराची चर्चा बैलगाडा शौकिनांनी सोशल मीडियावर व्हायरल केली आणि त्याची चर्चा जिल्हाभर रंगली. 

पांगरी येथे शनिवारी (दि २) श्री रोकडोबा महाराजांच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. ग्रामस्थांनी त्यासाठी लोकवर्गणी जमा करून मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील आयोजित केले होते. मात्र या सर्वांचे प्रमुख आकर्षण ठरले ते बैलगाडा घाटातील चिअर गर्ल्स ची उपस्थिती. नऊवारी साडी नेसून, नाकात नथ घालुन स्वतंत्र व्यासपीठावरून चिअर गर्ल्सने पहिल्या क्रमांकात येणाऱ्या बैलगाड्याला चिअर केले. क्रिकेट मध्ये चौकार, षटकार झाला की जशा चिअर गर्ल्स थिरकत असतात. त्याच धर्तीवर पांगरी घाटात बारीचे सेकंद पुकारून झाल्याबरोबर या मराठमोळ्या वेष परिधान केलेल्या चिअर गर्ल्स मराठी गाण्यांवर नाचून प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणीत करीत होत्या. भर उन्हात घाटात उभे राहून वाऱ्याच्या वेगाने धावणारा बैलगाडा पाहुन आनंद व्यक्त करणाऱ्या प्रेक्षकांना चिअर गर्लसनी सुद्धा तेवढाच आनंद मिळवुन दिला. आयोजकांच्या या अनोख्या शक्कलला प्रेक्षकांनी चांगली दाद दिली.

Web Title: Marathi cheer girls dancing in bullock cart race in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.