सेन्सॉर प्रमाणपत्र नसलेल्या मराठी चित्रपटांनाही ‘पिफ’मध्ये प्रवेश दिला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:09 AM2020-12-23T04:09:21+5:302020-12-23T04:09:21+5:30

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दरवर्षी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. गेली अनेक वर्ष मराठी ...

Marathi films without censor certificate will also be allowed in PIF | सेन्सॉर प्रमाणपत्र नसलेल्या मराठी चित्रपटांनाही ‘पिफ’मध्ये प्रवेश दिला जाणार

सेन्सॉर प्रमाणपत्र नसलेल्या मराठी चित्रपटांनाही ‘पिफ’मध्ये प्रवेश दिला जाणार

Next

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दरवर्षी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. गेली अनेक वर्ष मराठी चित्रपटांना या महोत्सवाने त्यांचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. महोत्सवाच्या नियमावलीप्रमाणे सहभागी चित्रपट ३१ डिसेंबरपूर्वी सेन्सॉर संमत असणे आवश्यक आहे. मात्र, कोरोनाचा फटका आणि कमी कालावधीमुळे ३१ डिसेंबर २०२०च्या आत सेन्सॉर प्रमाणपत्र मिळणे निर्मात्यांना शक्य नाही. त्यामुळे या वर्षात निर्मिती झालेल्या चित्रपटांचे नुकसान होऊ नये आणि त्यांना स्पर्धेसाठी पात्र होता यावे यासाठी यंदा ‘सेन्सॉर संमत’ आणि ‘सेन्सॉर न मिळालेल्या’ अशा दोन्ही प्रकारच्या मराठी चित्रपटांना प्रवेशाची सवलत मिळावी, अशा विनंती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्याकडे केली होती. ही विनंती मान्य करत पटेल यांनी २०२० या वर्षासाठी सेन्सॉर संमत आणि सेन्सॉर न मिळालेल्या अशा दोन्ही प्रकारच्या मराठी चित्रपटांना महोत्सवात सहभागी होण्याची परवानगी दिली आहे.

---

चौकट

चित्रपट महामंडळ हे करणार

* सहभागी चित्रपटाचे शीर्षक आणि बॅनर हे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे नोंदणीकृत असेल.

* संबधित चित्रपटाची निमिती ही २०२०मध्येच झाली आहे याची लॅब अथवा स्टुडिओकडून खातरजमा करून संबंधित चित्रपटाची डीसीपी प्रिंट दाखवण्यास तयार असल्याचे प्रमाणित करणार

* यावर्षी सहभागी अथवा प्रवेश नोंदणी केलेल्या चित्रपटांना पुढील वर्षी २०२२ ला सहभागी होता येणार नाही याची पूर्वसूचना दिली जाणार

---

कोरोनामुळे अनेक चित्रपटांचे शुटिंग थांबले होते. त्यामुळे पोस्ट प्रॉडक्शन आणि सेन्सॉर ला वेळ लागणार होता. महामंडळाच्या विनंतीला पिफ ने मान्यता दिली. यामुळे आता बरेच निर्माते पिफ मध्ये सहभाग घेऊ शकतील.

- मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

---

सिनेमॅटोग्राफी ऍक्ट नुसार चित्रपट सेन्सॉर केल्याशिवाय तो चित्रपटगृहात दाखवता येत नाही पण केंद्र सरकारने महोत्सवात सहभागी होणाऱ्या परदेशी, भारतीय आणि मराठी चित्रपटांना ही मुभा दिली आहे. मात्र एखादा मराठी चित्रपट यावर्षी पूर्ण झाला हे प्रमाणित कोण करणार? म्हणून पुणे फिल्म फौंडेशननेच चित्रपट महामंडळाला यावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले आहे.

- डॉ. जब्बार पटेल, पिफ अध्यक्ष

Web Title: Marathi films without censor certificate will also be allowed in PIF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.