मराठीत बोलणे, वाचणे आणि लिहिणे केले तरच मराठी भाषा समृद्ध : डॉ. श्याम दलाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:10 AM2021-03-01T04:10:49+5:302021-03-01T04:10:49+5:30
नसरापूर-माळेगाव येथील विजय आठवले विद्यालयात ज्ञानपीठ विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा ...
नसरापूर-माळेगाव येथील विजय आठवले विद्यालयात ज्ञानपीठ विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला. यावेळी डॉ. दलाल यांनी या विद्यालयात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी ज्ञानप्रकाश संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्याम दलाल, उपाध्यक्ष काशिनाथ पालकर, विक्रम कदम, मुख्याध्यापिका पवार, गोकुळ वनारसे आदी शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते.
कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय २१ जानेवारी २०१३ ला घेण्यात आला.
मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनवणे यांनी केले.
नसरापूर-माळेगाव येथील विजय आठवले विद्यालयात डॉ. दलाल यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.