धायरीतील मराठी वाचन संस्कृतीला मिळाला ‘आधार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:12 AM2021-07-27T04:12:15+5:302021-07-27T04:12:15+5:30
------------ धायरी : इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकणराची नव्हे तर मराठी माध्यमांमध्ये शिकणाऱ्या मुलांमध्येही वाचनाची संस्कृती कमी होत आहे अशा ...
------------
धायरी : इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकणराची नव्हे तर मराठी माध्यमांमध्ये शिकणाऱ्या मुलांमध्येही वाचनाची संस्कृती कमी होत आहे अशा काळात आधार सोशल ट्रस्टने घेतलेली स्पर्धा वाचाल तर वाचाल ही स्पर्धा जणू संजिवनी ठरते आहे. धायरी परिसरातील विद्यार्थी आणि पालकांनी यामध्ये नोंदवलेला सहभाग आणि त्यानिमित्त पुस्तकांचे केलेले वाचन यामुळे धायरीतील वाचन संस्कृतीला आधार दिला आहे असे प्रतिपादन सानेगुरुजी कथामालेचे कार्यवाह शामराव कराळे यांनी केले.
आधार सोशल ट्रस्टने ‘वाचाल... तर वाचाल’ या स्पर्धेची दुसरी माळ यंदाच्या लॉकडाऊनमध्ये घेतली होती. मुले व पालकांमध्ये वाचनाची आवड वाढावी यासाठी ही आगळी वेगळी स्पर्धा घेतील होती. त्यामध्ये धायरी व सिंहगड रोड परिसरातील तब्बल ७८० विद्यार्थ्यांनी सहभागी नोंदविला होता. त्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण थाटात पार पडले. अध्यक्षस्थानी शामराव कराळे हे होते. यावेळी मंचावर ट्रस्टेचे अध्यक्ष संतोष चाकणकर, स्पर्धेचे संयोजक सोपान बंदावणे, प्रा. निलिमा पुराणिक, सुरेंद्र पुराणिक, राहुल रायकर, सुनील देव, श्रीकृष्ण दुसे, राजेंद्र मारणे, कॅ. नारायण पाटील संदीप काकडे, रितेश चौरे आदी उपस्थित होते. सु
यावेळी संतोष चाकणकर म्हणाले की, कोरोनाच्या काळात मुलांना शाळेत जाता येत नाही, शिवाय कडक लॉकडाऊनमध्ये क्रीडांगण, बागेत खेळताही येत नव्हते त्यामुळे शिवाय मोबाईलवर भरणाऱ्या शाळामध्ये व व्हिडीओ गेम्समुळे मुले मराठी वाचनापासून लांब जात आहे. त्यांना पुन्हा मराठी वाचनाशी जोडण्यासाठी ही स्पर्धा घेतलीत त्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे या स्पर्धचे तिसरे सत्र पुन्हा घेण्यात येईल.
--
चौकट
स्पर्धचा निकाल असा :
अ गट : सिध्दी पोटपाडे (प्रथम), अर्णव चौधरी (व्दितीय), शर्वरी चोरगे (तिसरी). ब गट - आर्यन ढोले (प्रथम), सार्थक मिसाळ (व्दितीय), रोली पाल (तृतीय). शुभांगी आदवडे (प्रथम), अर्चना भोईरे (व्दितीय), अर्चना बिरादार (तृतीय). तिनही गटातील सर्व सहभागी स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र व पुस्तक बक्षिस देण्यात आले.
---
२६ धायरी आधार ट्रस्ट
वाचाल तर वाचला या स्पर्धेतील विजयी व सहभागी विद्यार्थ्यांसमवेत आयोजक समिती व प्रमुख पाहुणे