मुलांच्या दारातच भरते मराठी शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:08 AM2021-07-12T04:08:25+5:302021-07-12T04:08:25+5:30
भुलेश्वर: संपूर्ण जगाला हैरान केलेल्या कोरोनामुळे अनेक उद्योग-व्यवसाय मोडीत निघाले. याचा सर्वांत मोठा परिणाम शालेय शिक्षणावरती झाला. शाळा बंद ...
भुलेश्वर: संपूर्ण जगाला हैरान केलेल्या कोरोनामुळे अनेक उद्योग-व्यवसाय मोडीत निघाले. याचा सर्वांत मोठा परिणाम शालेय शिक्षणावरती झाला. शाळा बंद झाल्या व ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू झाले, मात्र ऑनलाइन शिक्षणामध्ये अनेक अडचणी आल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण फक्त नावापुरतेच राहिले. सध्या कोरोनाचे संकट काही अंशी कमी झाल्याने माळशिरस प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर मेमाणे यांनी माळशिरसमध्ये ‘शाळा विद्यार्थ्यांच्या घरी’ हा उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समोरासमोरील शिक्षणाने विद्यार्थी व शिक्षक अभ्यासात रमल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
शाळा बंद, पण शिक्षण चालू असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळशिरस शाळेतील शिक्षकांची तळमळ शिक्षक स्वतः विद्याथ्र्र्यांचे घरी वाड- वस्तीवर जाऊन कोरोनाचे नियम पाळून शिक्षण देत आहेत. मुलांचे गट करून अभ्यास घेत आहेत. जवळपास दीड वर्षं शाळा बंद असल्याने मुलांची प्रगती मंदावली आहे.
ऑनलाईन तासाला पाहिजे एवढा प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे मुख्याध्यापक सुधीर मेमाणे यांनी सर्व पालकांना व शिक्षकांना विश्वासात घेऊन हा उपक्रम सुरू केला आहे. पालकांचा व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे, सध्या ओसरीवर किंवा झाडाखाली
जागा मिळेल तिथे शिक्षक मुलांना शिक्षण देत आहेत.
यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर मेमाणे,साधना मेमाणे,नंदा कांबळे,बाळासाहेब भाडळे,भाऊसाहेब जगताप मुलांच्या दारात शिक्षण देत आहेत .प्राथमिक शाळा माळशिरसचे मुख्याध्यापक सुधीर मेमाणे यांच्या उपक्रमाचे
पंचायत समिती सदस्या सोनाली यादव,पोलीस पाटील पूजा यादव,माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसाहेब यादव यांनी अभिनंदन केले आहे.
माळशिरस प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर मेमाणे विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षण देत आहे.