पुण्यात अधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक; स्वारगेटच्या घटनेनंतर बसस्थानकांत होणार 'या' १० सुधारणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 18:14 IST2025-02-28T18:09:54+5:302025-02-28T18:14:50+5:30
बैठकीत बसस्थानकांच्या सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.

पुण्यात अधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक; स्वारगेटच्या घटनेनंतर बसस्थानकांत होणार 'या' १० सुधारणा
Swargate Bus Stand: पुण्यात स्वारगेट बसस्थानकात तरुणीसोबत घडलेल्या भयंकर घटनेनं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर अशा दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर व जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पीएमपीएल आणि एसटी महामंडळाचे बस स्थानकप्रमुख, पोलिस व महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत बसस्थानकांच्या सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
बसस्थानकांत कोणत्या सुधारणा होणार?
- बसस्थानकातील बंद पडलेल्या बसेस १५ एप्रिलपर्यंत स्क्रॅपमध्ये टाकण्यात येतील
- हिरकणी कक्ष अद्ययावत करणे
- महिला स्वतंत्र चौकशी व सुरक्षा हेल्प डेस्क.
- महिलांसाठी विशेष पिंक ऑटो रिक्षांची संख्या वाढवणे.
- बसेस पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार.
- बसस्थानक परिसरात केवळ गरजे पुरत्याच बसेस थांबवण्यात याव्यात.
-बसस्थानक परिसर व सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे.
- टोल फ्री नंबर ११२ चे फलक दर्शनी भागातच असावेत
- शाळा कॉलेजमधून १०९८ या टोल फ्री नंबरसंदर्भात जनजागृती
-बीट मार्शल,दामिनी पथकांची गस्त वाढणार