पुण्यात स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:49 PM2019-09-16T12:49:08+5:302019-09-16T12:51:59+5:30

लिंगायताना राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळावा, ही मोर्चेकरांची प्रमुख मागणी होती...

A march for the demand of an independent Lingayat religion in Pune | पुण्यात स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी मोर्चा

पुण्यात स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देपुण्यातल्या बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यापासून राज्यस्तरीय महामोर्चाला सुरुवातधर्म मान्यता आणि अल्पसंख्याक दर्जा मागणे हा आमचा मूलभूत अधिकार

पुणे : एक लिंगायत कोटी लिंगायत, लिंगायत धर्म स्वतंत्र धर्म, भारत देशा जय बसवेशा, आमच्या मागण्या पूर्ण करा, अशा घोषणा देत अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी रविवारी (दि. १५) पुण्यात महामोर्चा काढण्यात आला. 
लिंगायताना राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळावा, ही मोर्चेकरांची प्रमुख मागणी होती. पुण्यातल्या बाजीराव रस्त्यावरील बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यापासून या राज्यस्तरीय महामोर्चाला सुरुवात झाली. लिंगायतांच्या ५० धर्मगुरुंसह राज्यातून आणि कर्नाटक, तेलंगणामधून हजारो लिंगायत धर्मीय मोर्चात सहभागी झाले होते.  राष्ट्रसंत डॉ.  शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर, जगद्गगुरु चन्नबसवानंद महास्वामी, डॉ. बसवलिंग पट्टदेवरु भालकी स्वामीजी यांच्यासह अनेक धर्मगुरु, लिंगायत समन्वय समीतीचे राष्ट्रीय समन्वयक अविनाश भोसीकर, पुणे महामोचार्चे स्वागताध्यक्ष रमेश कोरे, राष्ट्रीय बसवराज दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज धनूर, सतीशकुमार पाटील, सदाशिव आलमखाने, सचिन पेठकर, बसवराज कनजे, मल्लीकार्जुन तगारे, बाळासाहेब होनराव, किरण बेललद, बसनगौडा पाटील, विश्वनाथ भुरे, रितेश घाणे आदींचा यात समावेश होता.
 अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करण्यासोबतच २०२१  मध्ये होणा-या राष्ट्रीय जनगणनेत लिंगायतांच्या लोकसंख्येची स्वतंत्र नोंद होण्यासाठी सरकारने वेगळी व्यवस्था करावी, लिंगायत धर्माच्या मूळ कन्नड भाषेतील वचन साहित्याला मराठीसह इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादीत करण्यासाठी स्वतंत्र मंडळाची किंवा प्रकल्पाची निर्मिती करावी, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापित करावे आदी मागण्या मोर्चेकºयांनी केले. विभागीय आयुक्तालयाजवळ मोर्चा समाप्त झाला. मागण्यांचे निवेदन यावेळी शासकीय अधिकाºयांनी स्विकारले.
...........
धर्म मान्यता आणि अल्पसंख्याक दर्जा मागणे हा आमचा मूलभूत अधिकार आहे. कुठल्याही पक्षाच्या आम्ही विरोधात नाही. सरकारने आमच्या मागण्यांचा विचार करावा. या मागण्या पूर्ण झाल्या तर आमच्या मुलांना रोजगार मिळेल. शिक्षण पद्धतीत सवलती मिळतील.- रमेश कोरे, स्वागताध्यक्ष, अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती
...........

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भाषण करताना महात्मा बसवेश्वरांचे नाव घेतले होते. त्यांचा आम्ही आदर करतो. मोदींनी आमच्या मागण्या पूर्ण करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा.-  बसवराज धनूर, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय बसवराज दल
सा 

Web Title: A march for the demand of an independent Lingayat religion in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.