भाजीपाल्यांच्या क्रेटसमधून येतोय गांजा; कस्टमने पकडला ६३ लाखांचा गांजा

By विवेक भुसे | Published: November 8, 2023 08:22 PM2023-11-08T20:22:13+5:302023-11-08T20:22:26+5:30

ट्रकमध्ये भाजीपाल्याचे क्रेटस लावून त्याच्याखाली पोत्यांमध्ये भरुन लपवून गांजा आणला जात होता

Marijuana coming from vegetable crates; Customs seized 63 lakh worth of ganja | भाजीपाल्यांच्या क्रेटसमधून येतोय गांजा; कस्टमने पकडला ६३ लाखांचा गांजा

भाजीपाल्यांच्या क्रेटसमधून येतोय गांजा; कस्टमने पकडला ६३ लाखांचा गांजा

पुणे : आंध्र प्रदेशातून गांजाची तस्करीचा प्रकार केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) उघडकीस आणला. सोलापूर जिल्ह्यातील कुडुर्वाडी परिसरात कस्टमच्या पथकाने गांजा वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकासह दोघांना पकडले. त्यांच्याकडून ६३ लाखांचा २११ किलो गांजा जप्त करण्यात आला. ट्रकमध्ये भाजीपाल्याचे क्रेटस लावून त्याच्याखाली पोत्यांमध्ये भरुन लपवून गांजा आणला जात होता.

आंध्र प्रदेशातील आरकू भागातून मोठ्या प्रमाणावर गांजा विक्रीस पाठविण्यात आल्याची कस्टमच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर कस्टमच्या पुणे कार्यालयातील पथकाने सोलापूर परिसरातील कुर्डुवाडी परिसरात सापळा लावला. पुणे-सोलापूर महामार्गावर बोरमणी गावाजावळ गांजा वाहतूक करणाऱ्या ट्रकला थांबविण्याची सूचना दिली. कस्टमच्या पथकाने ट्रकची तपासणी केली. तेव्हा ट्रकच्या आतील भागात ठेवलेल्या प्लास्टिक जाळीत (क्रेट्स) गांजा ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले. कस्टमच्या पथकाने २११ किलो गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजासह ट्रक असा ९३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी ट्रकचालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. कस्टमच्या पुणे कार्यालयातील अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक अभिषेक सिंग, अधीक्षक सुशांत त्यागी, निरीक्षक विनोद कुमार, रजत कुमार, जितेंद्र मीना, आशिष आवटी, विराज ढोकले आदींनी ही कारवाई केली. 

Web Title: Marijuana coming from vegetable crates; Customs seized 63 lakh worth of ganja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.