पुणे रेल्वे स्थानकावर होणार सागरी जीवांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:09 AM2021-07-11T04:09:52+5:302021-07-11T04:09:52+5:30

प्रसाद कानडे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेल्वेची वाट पाहुन तुम्हाला कंटाळा आला, तर तुमच्याकडे मनोरंजनासाठी एक चांगला पर्याय ...

Marine life will be seen at Pune railway station | पुणे रेल्वे स्थानकावर होणार सागरी जीवांचे दर्शन

पुणे रेल्वे स्थानकावर होणार सागरी जीवांचे दर्शन

Next

प्रसाद कानडे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रेल्वेची वाट पाहुन तुम्हाला कंटाळा आला, तर तुमच्याकडे मनोरंजनासाठी एक चांगला पर्याय असणार आहे. रेल्वे प्रवाशांना आता रेल्वे स्थानकावर सागरी जीवांचे दर्शन घडेल. कारण लवकरच पुणे रेल्वे स्थानकावर ॲक्वैरियम सुरू होत आहे. आयआरएसडीसी (इंडियन रेल्वे स्टेशन डेव्होपमेंट कॉर्पोरेशन ) ने यासाठी पुढाकार घेतला असून यासाठी खासगी संस्थेची मदत घेतली जात आहे.

ॲक्वैरियम साठी तीन जागेचा विचार सुरू आहे.या बाबत लवकरच निर्णय घेऊन कामाला सुरुवात होइल.

आयआरएसडीसी ही नवी संकल्पना राबवित आहे. रेल्वे स्थानकाचा विकास साधताना ते अधिकाधिक प्रवासीभिमुख करने, प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम केले जात आहे. पुणे स्थानकावर ॲक्वैरियम साठी तीन जागेचा विचार सुरू आहे. यात स्थानक परिसरातील गांधी पुतळ्या जवळची मोकळी जागा, आरक्षण केंद्रची इमारत व डीआरएम ऑफिस जवळील पार्किंग च्या जागेचा विचार केला जात आहे. लवकरच जागेची निश्चित केली जाणार आहे. जागा निश्चित झाल्यावर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल.

बॉक्स 1

प्रवाशांना काय पाहता येईल :

हे ॲक्वैरियम एखादया बोगद्याच्या आकाराचे असेल. याच्या दुतर्फा पाण्यात सागरी जीव असणार आहे.

प्रवाशांना या ठिकाणी विविध वनस्पती, स्टिंग रे, एल्स, शार्क, लॉबस्टर, गोगलगाई आणि झिंगासारखे विविध सागरी जीव. तसेच डॉल्फिन सह अन्य काही मोठे मासे देखील येते ठेवण्यात येणार आहे. मात्र यासाठी काही शुल्क आकारण्यात येणार आहे.

------------------------

तर पुणे देशातले दुसरे स्थानक ठरेल

बेंगळुरू स्थानकावर नुकतेच अशा प्रकारचे

ॲक्वैरियम सुरू झाले आहे.रेल्वे स्थानकावरचे हे देशातील पहिले ॲक्वैरियम ठरले. या नतंर पुणे स्थानक हे एक्वैरियम असलेले दुसरे स्थानक ठरेल. पुणे सह आनंद विहार, सिकंदराबाद स्थानकावर देखील अशा प्रकारचे ॲक्वैरियम सुरू करण्याचा

आयआरएसडीसी चा विचार आहे.

-----------------------

विमानतळांच्या बरोबरीने स्थानकांचा पुनर्विकास करून भारतीय रेल्वेचा कायापालट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

प्रवाशांना विविध सुविधा देताना त्यांच्या मनोरंजना चा भाग म्हणून आम्ही पुणे स्थानकावर ॲक्वैरियम सुरू करीत आहोत.यामुळे प्रवाशांना स्थानकावर गाडीची प्रतीक्षा करण्याच्या वेळेत सागरी जीवांचे दर्शन घडेल.

एस. के.लोहिया ,

व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, आयआरएसडीसी,

नवी दिल्ली.

Web Title: Marine life will be seen at Pune railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.