प्रेम भंग झाल्याने तरूणाची आत्महत्या?
By admin | Published: March 5, 2017 04:24 AM2017-03-05T04:24:54+5:302017-03-05T04:24:54+5:30
पिंपळे सौदागर येथील एका २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी ही पिंपळे सौदागर येथे उघडकीस आली आहे.
पिंपरी : पिंपळे सौदागर येथील एका २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी ही पिंपळे सौदागर येथे उघडकीस आली आहे. राहुल निकम (वय २५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रेमभंग झाल्याने त्याने आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,राहुलने शनिवारी राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुलच्या मोबाईलवर एका तरूणीचे ६५ मेसेज मिळाले आहेत. त्यामुळे आत्महत्या प्रेमभंगातूनच झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
राहुल हा मूळचा मनमाडचा आहे. नोकरीच्या शोधार्थ डिसेंबर महिन्यात तो पिंपळे सौदागर येथे भावाकडे आला होता. त्याला एका कंपनीत नोकरी मिळाली होती. शनिवारी दुपारी राहुलचा भाऊ आणि त्याची वहिणी हे किराणा आणण्यासाठी बाहेर गेले असता,राहुल ने घराचा दरवाजाची आतुन कडी लावली. (प्रतिनिधी)