बाजार फुलला

By Admin | Published: April 14, 2016 02:22 AM2016-04-14T02:22:45+5:302016-04-14T02:22:45+5:30

तब्बल दीड महिन्याच्या ‘बंद’नंतर बुधवारी शहरातील सोन्या-चांदीची बाजारपेठ पुन्हा फुलून गेली. दिल्ली सराफ संघटनांच्या बैठकीमध्ये गुरुवारऐवजी बुधवारीच दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.

Market bloom | बाजार फुलला

बाजार फुलला

googlenewsNext

पुणे : तब्बल दीड महिन्याच्या ‘बंद’नंतर बुधवारी शहरातील सोन्या-चांदीची बाजारपेठ पुन्हा फुलून गेली. दिल्ली सराफ संघटनांच्या बैठकीमध्ये गुरुवारऐवजी बुधवारीच दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बुधवारी सकाळपासूनच सोन्या-चांदीची सर्व दुकाने उघडण्यात आली. उद्या (दि.१४) गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी तब्बल दीड महिन्यानंतर दुकानांमध्ये गर्दी होणार आहे.
अबकारी कर कायद्याविरोधात देशभरातील सराफ संघटनांनी दि. १ मार्चपासून बेमुदत बंद आंदोलन सुरू केले होते. केंद्र सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही त्यावर तोडगा निघाला नाही. मागील आठवड्यात झालेल्या चर्चेमध्ये सराफ संघटनांनी सरकारला नव्याने प्रस्ताव देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारपासून बंद तात्पुरता मागे घेण्याची घोषणाही करण्यात आली; मात्र मंगळवारी पुन्हा दिल्लीत झालेल्या बैठकीत बुधवारपासूनच दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शहरातील बहुतेक सर्व दुकाने सकाळपासूनच खुली करण्यात आली होती. बुधवारी सोन्याला २८ हजार ७०० रुपये भाव मिळाला.

जवळपास ९० टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. अबकारी कायदा मागे घेण्याबाबत सहमती झाली नाही; मात्र सराफांच्या इतर प्रमुख मागण्या मान्य झाल्याने, पुन्हा बेमुदत बंद होण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती फेडरेशनचे सचिव दत्तात्रय देवकर यांनी दिली. फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका या वेळी उपस्थित होते.

Web Title: Market bloom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.