पणन सह संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले बाजार समितीच्या चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 04:30 AM2017-08-20T04:30:21+5:302017-08-20T04:30:21+5:30
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराबाबत विविध संघटनांनी केलेल्या आरोपांबाबत चौकशी करण्याचे आदेश पणन सह संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत.
पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराबाबत विविध संघटनांनी केलेल्या आरोपांबाबत चौकशी करण्याचे आदेश पणन सह संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि दलित युवक आंदोलन या संघटनांनी बाजार समितीच्या कारभाराच्या चौकशी करण्याची मागणी पणन संचालकांकडे केली होती. भरती प्रक्रिया, उपअभियंता पदाची नियुक्ती, संगणक यंत्रणेसह इतर विभागातील अनियमितता, ठेकेदारी पद्धत, प्रवेशशुल्काच्या माध्यमातून होणारी लूट अशा विविध बाबींची तक्रारी पणन संचालकांकडे करण्यात आली होती. यापार्श्वभूमीवर पणन सहसंचालकांनी चौकशी करून, त्याबाबतचा अहवाल संबंधितांना देण्याचा आदेश दिला आहे.