बाजार समितीच्या आवारात आग, १२ गाळे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 03:25 AM2018-05-05T03:25:17+5:302018-05-05T03:25:17+5:30
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील ओम नम: शिवाय फ्रूट पॅकेजिंग या दुकानात आणि गोडाऊनला आग लागल्याने १२ गाळ्यांमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. कोरोगेटेड बॉक्स आणि फळे सुरक्षित नेण्यासाठी कागदी कात्रण तयार करण्याचे काम या गोडावूनमध्ये चालत होते. रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
बारामती - बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील ओम नम: शिवाय फ्रूट पॅकेजिंग या दुकानात आणि गोडाऊनला आग लागल्याने १२ गाळ्यांमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. कोरोगेटेड बॉक्स आणि फळे सुरक्षित नेण्यासाठी कागदी कात्रण तयार करण्याचे काम या गोडावूनमध्ये चालत होते. रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
जयेश गालिंदे (रा. बारामती) यांच्या बारा गाळ्यांचे एकच गोडावून असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. बारामती नगरपालिका आणि एमआयडीसीच्या अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात आणली. तोपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते. या ठिकाणी १५ हजारांहून अधिक प्लॅस्टिकचे नवे कॅरेट, जुन्या ३५०, ९ हजारांहून अधिक कोरोगेटेड बॉक्स, साडेचार हजार कागदी कात्रण, संगणक, सीसीटीव्ही संच, कागदी कात्रण करणाऱ्या दोन मशीन, सेलोटेपचे २५ बॉक्स, प्लॅस्टिक दोरी, आॅफिस फर्निचर जळून खाक झाले. बारामती शहर पोलिसांनी, तहसील कार्यालयाच्या कर्मचाºयांनी पंचनामा केला. महावितरणच्या अधिकाºयांनी घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक अंदाजानुसार २० ते २१ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शहर पोलीस ठाण्यात गालिंदे यांनी फिर्याद दिली.