मंचर उपजिल्हा रुग्णालयाला बाजार समितीचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:09 AM2021-06-04T04:09:52+5:302021-06-04T04:09:52+5:30
यावेळी उपसभापती संजय शेळके, संचालक सखाराम काळे पाटील, गणपतराव इंदोरे, बाळासाहेब मेंगडे, अशोक डोके, दत्तात्रय वावरे, बाळासाहेब रंगनाथ बाणखेले, ...
यावेळी उपसभापती संजय शेळके, संचालक सखाराम काळे पाटील, गणपतराव इंदोरे, बाळासाहेब मेंगडे, अशोक डोके, दत्तात्रय वावरे, बाळासाहेब रंगनाथ बाणखेले, देहू कोकाटे, ज्ञानेश्वर घोडेकर, प्रमोद वळसे, अरुण बाणखेले,सचिव सचिन बोराडे उपस्थित होते.
मंचर उपजिल्हा रुग्णालयातील कोविड उपचार केंद्राची रुग्णक्षमता वाढविण्यात आल्याने येथे दैनंदिन वापराच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता. पाण्याचा तुटवडा दूर करण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेतला आहे.बाजार समितीच्या वतीने बाजार समिती आवारातील विहिरीचे पाणी पाईपलाईनद्वारे कायमस्वरुपी मंचर उपजिल्हा रुग्णालयाला पुरविण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव बाजार समितीच्या मासिक मिटिंगमध्ये घेण्यात आला आहे.त्यासाठी बाजार समिती स्वतःच्या खर्चातून ५६० मीटर अंतराची पाईपलाईन करणार असून त्यासाठी दोन लाख पन्नास हजार रुपये खर्च अपेक्षित आहेत. येत्या दहा ते बारा दिवसात या पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन बाजार समितीचे पाणी मंचर उपजिल्हा रुग्णालयास मिळणार आहे. पाईपलाईनचे काम होईपर्यंत उपजिल्हा रुग्णालयाची पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी मंचर बाजार समितीच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयाला टँकरद्वारे दोनवेळा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी दिली.