तिसऱ्या दिवशीही बारामती बाजार समिती बंदच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 11:34 PM2019-01-07T23:34:20+5:302019-01-07T23:35:07+5:30
व्यापाऱ्यांची भूमिका : बैठक निष्फळ, अजित पवार यांच्याशी चर्चेनंतर निर्णय घेणार
बारामती : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाºयांनी संस्थेच्या सचिवांच्या विरोधात मनमानी कारभार केल्याचा आरोप करीत गेल्या दोन दिवसांपासून कडकडीत बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समितीने व्यापारी आणि व्यवस्थापनासमवेत सोमवारी (दि. ७) बैठक घेतली. मात्र, यामध्येदेखील तोडगा निघू शकला नाही. व्यापाºयांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतरच संपाबाबत निर्णय घेण्याची भूमिका जाहीर केली आहे. बाजार समिती व्यवस्थापन आणि व्यापाºयांच्या वादात सोमवारी (दि. ७) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उडी घेतली. व्यापाºयांनी संप मागे न घेतल्यास सहायक निबंधकांकडे तक्रार करून त्यांचे परवाने निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
येथील व्यापारी आणि बाजार समितीचे संचालक प्रताप सातव यांच्या विरोधात बाजार समितीने अतिक्रमण केल्याची नोटीस बजावली आहे. त्या विरुद्ध व्यापाºयांनी ५ जानेवारीपासून कडकडीत बंद पाळला होता. सोमवारी झालेल्या बैठकीत सभासद, संचालक यांच्यात एकमेकांवर जोरदार आरोप- प्रत्यारोप झाले. या वेळी व्यापारी अमोल दोशी व्यापाºयांची बाजू मांडताना म्हणाले की, संचालक आक्रमकपणे उत्तर देत आहेत. एखाद्या संचालकाविरुद्ध तक्रारी अर्ज आल्यास त्याला त्याबद्दल कळविण्यास ४० दिवस एवढा कालावधी का लागला, ते प्रताप सातव आहेत म्हणून एवढा कालावधी का, असा सवालदेखील त्यांनी केला. व्यापारी शेतकºयांना त्रास व्हावा हा आमचा हेतू नाही. शेतकºयांच्या जिवावर आमचे पोट आहे. बºयाच वेळेला आम्ही व्यापारी सरकारी नियम डावलून शेतकºयांना मदत करतो, असे दोशी म्हणाले.
यावेळी बैठकीत संचालक मंडळाकडून व्यापाºयांना हा संप मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. पण व्यापाºयांनी आपल्या मतावर ठाम राहत बंद मागे घेण्यास नकार दिला. या वेळी सहायक निबंधक एस. एस. कुंभार उपस्थित होते. बंद मागे न घेतल्यास व्यापाºयांवर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. शासन नियुक्त संचालक पोपट खैरे यांनी, अजित पवार यांच्या सांगण्यामुळे संचालकाला पाठीशी घातले असल्याचा आरोप केला. या संचालकला पाठीशी घातले जात असल्यास आणि प्रत्येक गोष्ट नेत्यांना विचारायची, मग हे सभागृह अकार्यक्षम आहे काय,असा सवालदेखील खैरे यांनी केला. त्याच प्रमाणे ‘त्या’ संचालकांचा राजीनामा घ्या, अशी मागणी केली.
...व्यापाºयांचा परवाना रद्द करण्यात येईल
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बंदबाबत बाजार समिती व्यवस्थापनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी (दि. ७) सकाळी बाजार समिती पूर्ववत चालू न केल्यास बाजार समिती कायदा ८ चा ‘क’ कायद्यांतर्गत व्यापाºयांचे परवाना रद्द करण्यात येतील, अशा नोटीस बजावण्यात येणार असल्याचा इशारा बाजार समितीचे सभापती अनिल हिवरकर यांनी दिला आहे.
... अजित पवार यांनी कान पिळण्याची गरज
बारामती शहर तालुक्यात माळेगाव कारखाना वगळता सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. या सर्व संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो. दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या बारामती नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नगरसेवकांमधील गटबाजीचा प्रत्यय आला. नगराध्यक्षांसमवेत विरोधी नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची देखील खडाजंगी झाली. विरोधकांपेक्षा पक्षातीलच नगरसेवकांकडून वारंवार विरोध होत असल्याच्या भावनेतून नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी राजीनाम्याचा घेतलेला पवित्रा पक्षातील अंतर्गत गटबाजी अधोरेखित करणारा ठरला. त्यापाठोपाठ बाजार समितीमध्ये देखील सुरू झालेला बंद शेतकºयांसाठी गैरसोयीचा ठरला आहे. त्यामुळे बाजार समिती व्यवस्थापन आणि व्यापाºयांनी बंद पाळण्यापूर्वी सामोपचाराने मार्ग काढणे गरजेचे होते. मात्र, सामोपचाराने वाद न मिटता थेट घेतलेल्या ‘बंद’च्या भूमिकेमुळे गेल्या ३ दिवसांपासून शेतकºयांची गैरसोय झाली. यामध्ये नगर परिषदेसह बाजार समितीमधील दोषींचे पवार यांनी कान पिळण्याची गरज आहे. मंगळवारी (दि. ८) बारामती शहरात आहेत. पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
...अजित पवार यांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम
४बाजार समितीच्या व्यापाºयांशी चर्चा केली असता, आमचे म्हणणेच बैठकीत एकूण घेतले नाही. सगळे सगळ्या संघटना व्यापारी, हमाल, मापाडी, टेम्पो संघटना, कष्टकरी, सचिवांच्या विरोधात आहेत. आम्ही उद्या अजित पवार यांच्याशी चर्चा करून बंदविषयी निर्णय घेऊ. अजित पवार यांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम राहील, असे व्यापाºयांनी ‘लोकमत’शी
बोलताना सांगितले.
...गाडीचे भाडे द्यायला
देखील माझ्याकडे पैसे नाहीत
सोमवारी (दि. ७) बाजार समितीमध्ये रामभाऊ वाघमोडे या मालेगावच्या शेतकºयाने १० पोती गहू बाजारात विक्रीसाठी आणला होता. पण, बाजार समितीच्या व्यापाºयांनी बंद पुकारल्याने माझी पैशाची अडचण झाली. तसेच गाडीचे भाडे द्यायला देखील आता माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितले. मला देणेकºयांचा तगादा आहे मी बँंकेतून पैसे काढावे एवढ्या विश्वासाने आलो होतो. पण बाजार समिती बंद बघून मला काय करावे हेच कळेना, अशी व्यथा शेतकºयाने मांडली.
...व्यापाºयांची
मुजोरी चालली आहे
व्यापारी व संचालक यांची बैठक चालू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण आणि अन्य काहीजण येथे आले. त्यानंतर बैठकीत अजून गोंधळ वाढला. या वेळी ढवाण यांनी बंदबाबत नाराजी व्यक्त केली. ढवाण म्हणाले, की व्यापाºयांची मुजोरी चालली आहे. शेतकरी संघटना मुजोरी उतरवू शकते. हे वागणे बरे नव्हे. एवढ्याशा कारणावरून तुम्ही बंद ठेवून शेतकºयांना वेठीस धरत आहात. शेतकरी आपला माल कोठे विकणार, त्यांच्या गरज कशा भागणार,असा सवाल ढवाण
यांनी केला.