शेतकरी उत्पादक कंपन्यांमुळे शेतमालास थेट बाजारपेठ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 02:12 AM2018-12-05T02:12:20+5:302018-12-05T02:12:29+5:30

शेतकऱ्यांच्या फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांमुळे शेतमालास थेट बाजारपेठ उपलब्ध होऊ लागली आहे

Market directly to the farmer due to farmers' production companies | शेतकरी उत्पादक कंपन्यांमुळे शेतमालास थेट बाजारपेठ

शेतकरी उत्पादक कंपन्यांमुळे शेतमालास थेट बाजारपेठ

Next

खेड : शेतकऱ्यांच्या फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांमुळे शेतमालास थेट बाजारपेठ उपलब्ध होऊ लागली आहे. आडत, दलाल यांच्या मध्यस्थीशिवाय होणाºया खरेदी-विक्रीमुळे शेतकºयांच्या शेतमालास चांगला भाव मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.
सध्या नवीन कांदा निघू लागला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून थेट शेतावरच खरेदी करण्यात येत आहे. कंपनी कायद्यानुसार कंपन्या नोंदणीकृत असल्याने आणि उत्पादक कंपन्यांचे शेतकरी सभासद असल्याने शेतकºयांचा कल अशा कंपन्यांकडे शेतमाल देण्यासाठी कल असल्याचे दिसून येते. शेतकºयांचे संघटन असणाºया या उत्पादक कंपन्यांची शेतकºयांसाठी महत्त्वाची भूमिका ठरत आहे. आडत, दलाली, वाहतूक, कमिशन, हमाली, तोलाई या सर्व बाबींना फाटा बसत असल्याने शेतकºयांना चांगला भाव देणे उत्पादक कंपन्यांना शक्य होऊ लागले आहे.
आंतरराज्य व्यापाराची संधी शेतकºयांचे संघटन असणाºया कंपन्यांना मिळू लागली आहे. त्यामुळेच उत्तर पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कांद्यासारखा शेतमाल कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांसह उत्तर भारतातही पाठविण्यास सुरुवात केली आहे. शासनाची अंगीकृत असणारी नाफेड ही संस्थाही दर वर्षी कांदा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून खरेदी करीत असते. थेट शेतावरून कांदा शेतकरी उत्पादक कंपन्या खरेदी करीत असल्याने तुलनेत शेतकºयांचा चांगला फायदा होताना दिसत आहे.
>शासनाच्या विविध योजना शेतकºयांमध्ये पोहोचवणे हे महत्त्वाचे काम उत्पादक कंपन्या करीत आहेत. दुवा म्हणून होणारे हे काम व्यापक स्वरूपात होइल. शेतमाल निर्यातीस चालना देणे, सेंद्रिय शेतीचा प्रयत्न, उत्पन्न वाढवणे, बाजारपेठ निर्माण करणे, शेतकºयांना चांगले पैसे मिळवून देणे, पैशांची सुरक्षितता यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे मुख्य काम शेतकºयांसाठी फायदेशीर ठरेल.
- सुरेश पवार,
पाणझरा परिसर
शेतकरी उत्पादक कंपनी.
>शेतकºयांचे संघटन शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून होत आहे. शेतमालास थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची भूमिका शेतकरी उत्पादक कंपन्यांची आहे. त्यामुळे शेतकºयांच्या उत्पादित मालास चांगला भाव व थेट बाजारपेठ मिळवून देण्यात उत्पादक कंपन्या महत्त्वाची भूमिका बजावतील.
- मदन वाबळे, व्यवस्थापकीय संचालक (इर्जीक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी)

Web Title: Market directly to the farmer due to farmers' production companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.