कांदा लिलावात बाजारभाव पुन्हा घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:09 AM2021-07-17T04:09:53+5:302021-07-17T04:09:53+5:30

कांद्याचे चांगल्या आवकेसाठी प्रसिद्ध असलेल्या आळेफाटा पहिल्या आठवड्यापर्यंत कांद्याचे भाव टिकून होते. मात्र शुक्रवार, रविवार व मंगळवारी झालेल्या लिलावात ...

Market prices fell again at the onion auction | कांदा लिलावात बाजारभाव पुन्हा घसरले

कांदा लिलावात बाजारभाव पुन्हा घसरले

Next

कांद्याचे चांगल्या आवकेसाठी प्रसिद्ध असलेल्या आळेफाटा पहिल्या आठवड्यापर्यंत कांद्याचे भाव टिकून होते. मात्र शुक्रवार, रविवार व मंगळवारी झालेल्या लिलावात भावात घसरण होण्यास सुरुवात झाली. आज शुक्रवारी झालेल्या लिलावात पुन्हा भाव घसरले. सरासरी दहा किलो कांद्याचे १५० ते १७० रुपयांपर्यंत विक्रीचे अधिक लिलाव झाले. भावात घसरण होत असताना येथील आवकही कमी अधिक होत आहे. आज शुक्रवारी १२ हजार आठशे कांदा गोणी विक्रीस आल्याचे सचिव रूपेश कवडे व कार्यालयप्रमुख प्रशांत महांबरे यांनी सांगितले.

परराज्यांतून कांद्यास असणारी मागणी कमी होत असल्याने भावात घसरण होत असल्याचे आडतदार व्यापारी संजय कुऱ्हाडे व जीवन शिंदे, संदीप कोरडे व पप्पू गडगे यांनी सांगितले. प्रतवारीप्रमाणे प्रती दहा किलो दर याप्रमाणे : एक नंबर गोळा कांदा १८० ते २०० रुपये, दोन नंबर कांदा १५० ते १८० रुपये, तीन नंबर कांदा ८० ते १५० रुपये.

Web Title: Market prices fell again at the onion auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.