कांद्याची आवक वाढूनही बाजारभाव स्थिर, टोमॅटोची प्रचंड आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:07 AM2021-07-05T04:07:51+5:302021-07-05T04:07:51+5:30

वांगी, भेंडी, कारली, ढोबळी मिरची, गवार,दुधी भोपळा, काकडी या फळभाज्यांची आवक वाढल्याने बाजारभावात घसरण झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी,कोथिंबीर व ...

Market prices remain stable despite rising onion arrivals, huge inflows of tomatoes | कांद्याची आवक वाढूनही बाजारभाव स्थिर, टोमॅटोची प्रचंड आवक

कांद्याची आवक वाढूनही बाजारभाव स्थिर, टोमॅटोची प्रचंड आवक

Next

वांगी, भेंडी, कारली, ढोबळी मिरची, गवार,दुधी भोपळा, काकडी या फळभाज्यांची आवक वाढल्याने बाजारभावात घसरण झाली.

पालेभाज्यांच्या बाजारात मेथी,कोथिंबीर व शेपू भाजीची मोठी आवक झाली.जनावरांच्या बाजारात बैल,जर्शी गाय,म्हैस तर बकरी ईदमुळे शेळ्यांमेंढ्यांच्या संख्येत संख्येत मोठी वाढ झाली. एकूण उलाढाल ३ कोटी ३० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १,००० क्विंटल झाली. मागील शनिवारच्या तुलनेत १०० क्विंटलने कमी होऊनही भावात २,००० रुपयांवर स्थिरावले.तळेगाव बटाट्याची एकूण ९०० आवक क्विंटल झाली.मागील आठवड्याच्या तुलनेत आवक २५० क्विंटलने कमी झाल्याने १०० रुपयांनी भाव घटले.

बटाट्याचा बाजारभाव १,६०० रुपयांवरुन १,५०० रुपयांवर आला. लसणाची एकूण आवक १६ क्विंटल झाली. लसणाचा ९,००० रुपये बाजारभाव मिळाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक १३३ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला २,५०० ते ३,५०० रुपये असा भाव मिळाला.

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे –

कांदा - एकूण आवक - १,००० क्विंटल. भाव क्रमांक १. २,००० रुपये, भाव क्रमांक २. १,५०० रुपये, भाव क्रमांक ३. १,२०० रुपये.

बटाटा - एकूण आवक - ९०० क्विंटल. भाव क्रमांक १. १,५०० रुपये, भाव क्रमांक २. १,३०० रुपये, भाव क्रमांक ३. ९०० रुपये.

फळभाज्या -

चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे -

टोमॅटो - ८१३ पेट्या ( ४०० ते ८०० रू. ). कोबी - ३० पोती ( १,००० ते २,००० रू. ). फ्लॉवर - ९८ पोती ( ६०० ते १,२०० रु.),वांगी - १७२ पोती ( २,००० ते ३,००० रु.). भेंडी - १४५ पोती ( १,५०० ते २,५०० रु.),दोडका - ६३ पोती ( ३,००० ते ५,००० रु.). कारली - १२१ डाग ( २,००० ते ४,००० रु.). दुधीभोपळा - ७० पोती ( १,००० ते १,६०० रु.),काकडी - ९३ पोती ( १,००० ते १,६०० रु.). फरशी - १. पोती ( ७,००० ते ९,००० रु.). वालवड - २. पोती ( ४,००० ते ६,००० रु.). गवार - १०२ पोती ( २,५०० ते ३,५०० रू.), ढोबळी मिरची - १२३ डाग ( १,५०० ते २,५०० रु.). चवळी - ३. पोती ( १,५००) ते २,५०० रुपये ). वाटाणा - २. पोती ( ६,००० ते ८,००० रुपये ). शेवगा - ३. पोती ( ४,००० ते ६,००० रुपये ). गाजर - ५१ पोती ( १,००० ते २,००० रु.).

पालेभाज्या –

राजगुरुनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची १. हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला १,००० ते २,५०० रुपये प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबिरीची २. हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना ५०० ते २,००० रुपये एवढा भाव मिळाला.शेपूची ६००० जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ४०० ते १,१५० रुपये भाव मिळाला. पालकची काहीही आवक झाली नाही.

चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रतिशेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे -

मेथी - एकूण १ लाख ६ हजार जुड्या ( १,००० ते १,६०० रुपये ). कोथिंबीर - एकूण २. हजार ५०० जुड्या ( ५०० ते १,००० रुपये ). शेपू - एकुण ४३ हजार ५० जुड्या ( ५०० ते ७०० रुपये ). पालक - एकूण १ हजार ६०० जुड्या ( ४०० ते ६०० रुपये ).

* जनावरे -

चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ६० जर्शी गायींपैकी ४० गाईची विक्री झाली. ( १२,००० ते ६,५००० रुपये ). २०० बैलांपैकी १५५ बैलांची विक्री झाली.( १०,००० ते ३,५००० रुपये ). १३५ म्हशींपैकी ८५ म्हशींची विक्री झाली. ( २०,००० ते ७,०००० रुपये ). शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या १११३० शेळ्या - मेंढ्यापैकी १०१२० मेंढ्यांची विक्री झाली.

चाकण बाजारातील आडतदार लहू कोळेकर यांच्या गाळ्यावर टोमॅटोची मोठी आवक झाली.

Web Title: Market prices remain stable despite rising onion arrivals, huge inflows of tomatoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.