गोडधोड पदार्थांची बाजारपेठ गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 06:26 AM2017-10-05T06:26:37+5:302017-10-05T06:27:07+5:30

अवघ्या १३ दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाचा बाजारपेठेत सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. मुख्य आकर्षण असणाºया गोडधोड पदार्थांची बाजारपेठ गजबजली आहे.

The market of the sweet food market has shaky | गोडधोड पदार्थांची बाजारपेठ गजबजली

गोडधोड पदार्थांची बाजारपेठ गजबजली

Next

बारामती : अवघ्या १३ दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाचा बाजारपेठेत सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. मुख्य आकर्षण असणाºया गोडधोड पदार्थांची बाजारपेठ गजबजली आहे. तयार पदार्थांना मागणी वाढली आहे. गावरान तुपातील पदार्थांना विशेष मागणी आहे. याशिवाय घरगुती फराळासह राजस्थानी, बंगाली पदार्थांना विशेष पसंती आहे.
नागरिक आरोग्याबाबत कमालीचे दक्ष झाले आहेत. त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये, यासाठी गावरान तुपातील पदार्थांना मागणी आहे. तुलनेने या पदार्थांचे दर चढे आहेत. तरीही पसंती दिली जात आहे. यामध्ये घरगुती पद्धतीने बनविलेल्या गावरान तुपातील पदार्थ ग्राहक मागणी करीत आहेत.
जीएसटीमुळे तयार पँकिंगमधील पदार्थांचे दर वाढलेले आहेत,असे शहरातील स्वीट होम व्यावसायिकांनी सांगितले. दिवाळी गिफ्टसाठी आकर्षक सोनेरी, चकचकीत वेष्टनात गुंडाळलेले, पॅक बॉक्स उपलब्ध आहेत. कंपनीकडून कर्मचाºयांना दिवाळी भेट देण्यासाठी या आकर्षक स्वीट बॉक्सला मागणी आहे.
पारंपरिक असणाºया शंकरपाळी, खारीशंकरपाळी, बेसनलाडु, अनारसे, चकली, नाचणी लाडू, रवा लाडू, सुकामेवा, डिंक लाडू, मोतीचूर लाडूसह स्पेशल माहिम हलवा, चंद्रकला, गोड चिरोटे, म्हैसुरपाक, बालुशाही, काजूबाइट, काजू चोको बाइट, काजूकतली, काजूगजक, चॉकलेट कतली, अंजीर बर्फी, स्पेशल बदाम शेक, केसरी पेढा, कं दी पेढा, मलई पेढा, कलाकंद, सोनपापडी, स्पेशल लाडू, गुलकंद बर्फी, आंबा बर्फी, पिस्ता बर्फी, मावा बर्फी ,गुलाबजामून, रसगुल्ले, बदाम हलवा, बंगाली मिठाई आदी पदार्थांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मागणी आहे.

...म्हशीच्या दुधापासून
बनविला जातो खवा
स्वीट होममध्ये सर्वच पदार्थ बनविण्यासाठी खवा आवश्यक असतो. मात्र, भेसळ टाळण्यासाठी स्वत: खवा तयारकरत आहेत. दर्जा राखल्यानंतर पदार्थांची चव ग्राहकांच्या पसंतीस उतरली जाते. सोमेश्वरनगर परिसरातून खवा बनविण्यासाठी म्हशीचे दूध मागविण्यात येत असल्याचे लक्ष्मी स्वीट्सचे प्रकाश चौधरी यांनी ‘लोेकमत’शी बोलताना दिली.

घरगुती पद्धतीने घरी बनविलेल्या गावरान तुपातील पदार्थांना मोठी मागणी आहे. या पदार्थांचे दर नेहमीच्या तुलनेने अधिक आहेत.मात्र, केवळ दर्जाचा आग्रह करून गावरान तुपातील पदार्थांना मागणी वाढली आहे. यामध्ये शुद्ध तुपातील बेसन,रवा, डिंक लाडूला विशेष मागणी आहे. या शिवाय ‘ रेडी टू मेक’ प्रकारामध्ये चकली,अनारसे पीठ उपलब्ध आहेत. या प्रकारात तयार पीठामध्ये केवळ गरम पाणी मिसळून हे पदार्थ उकळत्या तेलात तळायचे. अवघ्या काही मिनिटांत हे पदार्थ खाण्यासाठी तयार होतात. महिला वर्ग या पदार्थांसाठी नोंदणी करत आहे. मागणी नोंदविल्यावर चार ते पाच दिवसांमध्ये तयार पदार्थ दिले जातात, असे समाधान मसाले फुड्स प्रा. लि.च्या प्रमुख विद्या प्रकाश झगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

मधुमेही रुग्णांसाठी खास कंदी पेढे
मधुमेहाच्या रुग्णांकडून नेहमी कमी साखरेच्या पदार्थांना मागणी असते. मात्र, साखरेची गोडी सर्वच पदार्थांमध्ये आवश्यक असते. त्याशिवाय या पदार्थांना लज्जत येत नाही. त्यामुळे इतर पदार्थांमधील साखर कमी करता येत नाही. मात्र, कमी साखरेचे पेढे बनविले जातात. या पेढ्यांना मधुमेहाच्या रुग्णांसह इतरांकडूनदेखील चांगली मागणी असते. त्यामुळे दिवाळीच्या बाजारात इतर पदार्थांची भाऊगर्दी होऊनदेखील कंदी पेढे आपले स्थान टिकवून आहेत, असे स्वीट होम व्यावसायिकांनी सांगितले.

Web Title: The market of the sweet food market has shaky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.