वासुली फाटा येथील बाजारपेठ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:06 AM2021-03-30T04:06:08+5:302021-03-30T04:06:08+5:30
चाकण औद्योगिक वसाहतीमधील वासुली फाटा येथे सर्वांत मोठी बाजारपेठ असून, या ठिकाणी आठवड्यातील दर रविवारी मोठा आठवडे बाजार भरत ...
चाकण औद्योगिक वसाहतीमधील वासुली फाटा येथे सर्वांत मोठी बाजारपेठ असून, या ठिकाणी आठवड्यातील दर रविवारी मोठा आठवडे बाजार भरत असतो. येथील आठवडे बाजारात हजारो ग्राहक विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी येतात. यामध्ये एमआयडीसीत काम करणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे.या बाजारात खरेदीसाठी येणारे अनेक लोक तोंडाला मास्क लावत नाहीत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.यासाठी भांबोली ग्रामपंचायतने एक दिवसासाठी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.
एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये येणारे कामगार हे पिंपरी- चिंचवड, पुणे शहरातून जास्त संख्येने येतात.तसेच रोजंदारीवर काम करणारे शेकडो कामगार कंपन्यांच्या जवळपास असणाऱ्या गावांमध्ये भाड्याने खोल्या घेऊन राहत आहेत.मधल्या काळात कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने कंपन्यांमध्ये सोशल डिस्टन्स,सॅनिटायझर व मास्क याकडे दुर्लक्ष केले.यामुळे औद्योगिक वसाहतीमधील गावांमध्ये कोरोनाच्या विषाणूने हातपाय पसरण्याआधी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.यासाठी भांबोली ग्रामपंचायतने पुकारलेला एक दिवसीय बंद करण्यात आला होता. त्याप्रमाणे सर्वांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते.
* फोटो - वासुली फाटा येथे रविवारी सर्व व्यवहार बंद होते.