Pune: गणपती विसर्जनामुळे 'या' दिवशी मार्केट यार्ड बाजार राहणार बंद
By अजित घस्ते | Published: September 25, 2023 08:44 PM2023-09-25T20:44:36+5:302023-09-25T20:47:40+5:30
बाजार घटकांचे नुकसान होऊ नये आणि सुरक्षितेच्या दुष्टीने शुक्रवारी (दि. २९ ) मार्केट यार्ड बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे...
पुणे : गणेशोत्सव काळात पुणे शहरात मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी नागरिक येतात. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होते. परिणामी रस्ते बंद असतात. बाजार घटकांचे नुकसान होऊ नये आणि सुरक्षितेच्या दुष्टीने शुक्रवारी (दि. २९ ) मार्केट यार्ड बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या मार्केट यार्ड येथील फळे भाजीपाला बाजार, फुलबाजार, खडकी उपबाजार, मोशी उपबाजार व मांजरी उपबाजार अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार (दि.२९) सप्टेंबरला मार्केट यार्ड बाजार बंद राहतील. तसेच पेट्रोलपंप विभाग ( दि. २८) दुपारी २:०० पासून ते दि. २९ सकाळी ८:०० वाजेपर्यंत बंद राहणार असल्याचे बाजार समितीचे सभापती व सचिव यांनी प्रसिध्द पत्रकातून दिली. या दिवशी शेतकरी बंधूंनी शेतीमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.