मार्केटयार्डमध्ये कोरोनामुळे निर्माण झालेली कोंडी ३१ मार्चपर्यंत कायम; आडत्यांमध्ये धास्तीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 05:20 PM2020-03-27T17:20:05+5:302020-03-27T17:30:57+5:30
आडत्यांशिवाय बाजार सुरु राहणार बाजार समिती प्रशासनाची भूूमिका
पुणे: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मार्केट यार्डातील आडत्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. यामुळेच शुक्रवार (दि.27) रोजी झालेल्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड असोसिएशनच्या तातडीच्या बैठकीत ३१ मार्चपर्यंतचा बंद कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील आडत्यांनी भाजीपाला, फळे आणि कांदा व बटाटा विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.याशिवाय दि.पूना मर्चट चेंबरने देखील 31 मार्च पर्यंत भूसार व गूळ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार चेंबरने शुक्रवार (दि.27) पासून बाजार सुरू केला आहे. . या पार्श्वभूमीवर आज आडते असोसिएशन आणि कामगार संघटनांची बैठक झाली. यामध्ये बाजारा मध्ये होणाऱ्यां गर्दीमुळे व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच मार्केट यार्डातील बाजार सुरळीत होण्यासाठी काही उपाययोजना करण्याची मागणी आडत्यांनी केली. यामध्ये लॉकडाऊन मुळे खरेदीदारांची वाहने बाहेर पोलिसांकडून अडवली जाणार नाहीत. तसेच, खरेदीदारांना त्यांना स्टॉल, हातगाडीवर किरकोळ विक्री करण्यास परवानगी दिली पाहिजे .तरच ते मार्केट यार्ड तून फळे आणि भाजीपाला खरेदीदार खरेदी करतील. अन्यथा मार्केट याडार्तील मालाची विक्री होणार नाही. त्यामुळे त्यांना ओळखपत्र देण्याची मागणी बाजार समितीकडे करण्यात आली आहे. तसेच कामगार देखील आपल्या गावाला गेल्याने कामगारांचाही प्रश्न आहे.परंतु कामगार संघटनांनी रविवार पासून कामगार कामावर हजर होणार असल्याचे सांगितले.