येत्या शुक्रवारी पुण्यातील मार्केट यार्ड राहणार बंद; 'शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणू नये'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 04:01 PM2022-03-16T16:01:46+5:302022-03-16T16:06:24+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांची माहिती
पुणे: धुलिवंदनानिमित्त (dhulivandan) मार्केट यार्ड (pune market yard) येत्या शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, भाजीपाला आणि पान बाजार या दिवशी सुरू राहील, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी जाहीर केले आहे. येत्या शुक्रवारी मार्केट यार्डातील मुख्य बाजार आवारातील फुलांचा बाजार, केळी बाजार, तसेच मोशी उपबाजार बंद राहणार आहे.
या दिवशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस बाजारात आणू नये. मात्र फळे व भाजीपाला बाजारास धुलिवंदन सणाची साप्ताहिक सुटी जोडून येत असल्याने शुक्रवारी (दि. १८) रोजी धुलिवंदनादिवशी फळे भाजीपाला बाजार व पान बाजार तसेच इतर उपबाजार नियमितपणे सुरू राहणार आहेत, याची नोंद व्यापारी, व्यावसायिकांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मार्केट याई बंद असले तरी शुक्रवारी भाजीपाला आणि पान बाजार सुरूच राहणार आहे.