Marashtra Bandha: पुण्यातील मार्केटयार्ड बंद राहणार; सर्व संघटनांचा संयुक्तरीत्या बैठकीमध्ये निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 06:24 PM2021-10-10T18:24:02+5:302021-10-10T18:24:24+5:30

लखीमपूर (lakhimpur) घटनेच्या निषेधार्थ मार्केटयार्डमधील सर्व संघटनाची संयुक्तरीत्या बैठकीमध्ये महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Marketyard in Pune will remain closed Decision of all the organizations in the joint meeting | Marashtra Bandha: पुण्यातील मार्केटयार्ड बंद राहणार; सर्व संघटनांचा संयुक्तरीत्या बैठकीमध्ये निर्णय

Marashtra Bandha: पुण्यातील मार्केटयार्ड बंद राहणार; सर्व संघटनांचा संयुक्तरीत्या बैठकीमध्ये निर्णय

Next
ठळक मुद्देसर्व संघटनेच्या वतीने मृत पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार

पुणे : लखीमपूर येथील शेतकरी हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची (Marashtra Bandha) हाक दिली आहे. त्यामुळे मार्केट यार्डमधील सर्व संघटनाची संयुक्तरीत्या बैठकीमध्ये महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने मार्केट यार्डमधील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, आडते असोसिएशन, तोलणार संघटना, महात्मा फुले कामगार युनियन, टेम्पो पंचायत, महाराष्ट्र टेम्पो संघटना, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, भारतीय कामगार सेना, हमाल पंचायत इत्यादी सर्व संघटनेच्या वतीने सकाळी १० वाजता अण्णासाहेब मगर पुतळा, फळे-भाजीपाला विभाग गेट नंबर-१ या ठिकाणी लखीमपूरमध्ये चिरडून मृत पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे, असे अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक संतोष नांगरे यांनी सांगितले.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे विजय चोरगे, शशिकांत नांगरे, संजय साष्टे, नितीन जामगे, विशाल केकाने, दीपक जाधव, भरत शेळके, दत्तात्रय गजघाटे, विकास थोपटे, टेम्पो पंचायतीचे गणेश जाधव, चंद्रकांत जवळकर, सुरेश टक्कर, राजू रेणुसे, तोलणार संघटनेचे राजेंद्र चोरगे, हनुमंत बहिरट, प्रवीण पाटील, संतोष ताकवले, किशोर भानूसगरे, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे विवेक ओंबासे, भारतीय कामगार सेनेचे दादा तुपे व कामगार उपस्थित होते.

Web Title: Marketyard in Pune will remain closed Decision of all the organizations in the joint meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.